युगेंद्र पवार यांच्या विजयासाठी शरद पवारांचं कुटुंब कामाला, नातवासाठी आजी, भावासाठी बहीण मैदानात

युगेंद्र पवार यांच्या प्रचाराकरिता खासदार शरद पवार यांची नात रेवती सुळे मैदानात उतरल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांनी शहरामध्ये रॅली काढली. तर आजी प्रतिभा पवार यांनीदेखील मतदारसंघाचा दौरा करत युगेंद्र पवार यांचा प्रचार केला.

युगेंद्र पवार यांच्या विजयासाठी शरद पवारांचं कुटुंब कामाला, नातवासाठी आजी, भावासाठी बहीण मैदानात
नातूसाठी आजी बारामती पश्चिममध्ये, भावासाठी बहीण रेवती सुळे बारामती शहरात प्रचाराला
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 10:02 PM

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी काका-पुतण्यामध्ये लढाई होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने यूगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचाराकरिता आज खासदार शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे प्रचारामध्ये उतरल्या. त्यांनी शहरामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये रॅली काढली. दुसरीकडे शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीदेखील युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी दौरा करत नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या.

नातूसाठी आजी प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं आज बघायला मिळालं. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी आज पश्चिम भागाचा दौरा करत गाठीभेटी घेतल्या. लोकसभेच्या निवडणुकीत देखील प्रतिभा पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. बारामती विधानसभा मतदारसंघातील काका-पुतण्याची लढाई ही अत्यंत चुरशीची होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रोहित पवारही मैदानात

विशेष म्हणजे रेवती सुळे आणि प्रतिभा पवार यांच्याआधी शरद पवारांचे नातू तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीदेखील काल युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामती तालुक्याचा दौरा केला होता. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही चुरशीची होणार आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रोहित पवार काल प्रचारासाठी मैदानात उतरलेले बघायला मिळाले. रोहित पवार यांनी काल बारामती तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा केला होता.

“बारामती ही शरद पवारांचीच आहे हे लोकसभेला दाखवून दिले आहे. बारामती आजही शरद पवारांची आहे आणि उद्याही त्यांचीच राहील. आम्ही २३ तारखेला बारामतीत तुतारीचाच गुलाल उधळू. आम्ही आहोत त्याच ठिकाणी आहोत. आम्ही काय महायुतीसोबत गेलो नाहीत. जमेची बाजू आमची ही आहे की शरद पवार आमच्यासोबत आहेत. बारामतीत परिवर्तन झालेल आपल्याला पहायल मिळेल. पुन्हा एकदा लोकसभा लागली की काय अस वातावरण पाहायल मिळतंय”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.