सहकारी बँका वाचवा, शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र

आधुनिक तंत्रज्ञान नसल्याने रिझर्व्ह बँकेला प्रत्येक वर्षी इन्स्पेक्शन करणे कठीण जात आहे, त्यामुळे सहकारी बँकांना खासगी बँकेत परिवर्तीत करण्यास जोर धरला जात आहे, याकडे पवारांनी लक्ष वेधले.

सहकारी बँका वाचवा, शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र
Follow us
| Updated on: Aug 19, 2020 | 8:06 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. शंभर वर्षांपेक्षा मोठा इतिहास असलेल्या सहकारी बँकांबाबत पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी सहकारी बँकांच्या संरक्षणाची मागणी नरेंद्र मोदींकडे केली आहे. लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधानांना पवारांनी लिहिलेले हे पाचवे पत्र आहे. (Sharad Pawar writes letter to PM Narendra Modi expressing concern about Co-operative banks)

ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन भाषण करताना इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानांनी सहकारी बँकांचा उल्लेख केला, असे पवार पत्राच्या सुरुवातीला म्हणतात. “केंद्र सरकारने मध्यमवर्गीयाचे हित जपण्यासाठी सहकारी बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेतल्याचे तुम्ही म्हणालात. लघु आणि मध्यम क्षेत्रासाठी असलेल्या या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाचे मी स्वागत आणि कौतुक करतो” असे पवारांनी लिहिले आहे.

सहकारी बँकाना 100 वर्षाची परंपरा लाभली आहे. सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. मात्र प्रथमदर्शनी आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून रिझर्व्ह बँकेचे सहकारी बँक क्षेत्राबाबतचे धोरण ‘अस्पृश्य’तेचे राहिले आहे, असा खेद पवारांनी व्यक्त केला आहे.

आधुनिक तंत्रज्ञान नसल्याने रिझर्व्ह बँकेला प्रत्येक वर्षी इन्स्पेक्शन करणे कठीण जात आहे, त्यामुळे सहकारी बँकांना खासगी बँकेत परिवर्तीत करण्यास जोर धरला जात आहे, याकडे पवारांनी लक्ष वेधले.

“सहकारी बँकामध्ये आर्थिक शिस्त आणण्याचीही गरज असल्याचे म्हटले जाते, मात्र सहकारी बँकांना खासगी बँकेत रुपांतरीत केल्यास आर्थिक अनियमितता आणि घोटाळे होण्याची भीती शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. घोटाळे, रक्कम आणि टक्केवारी मांडत पवारांनी सहकारी बँकांना खासगी बँकेत रुपांतरीत करणे चुकीचे असल्याचे मत मांडले आहे. या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणीही शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे. (Sharad Pawar writes letter to PM Narendra Modi expressing concern about Co-operative banks)

संबंधित बातम्या :

अडचणीतील साखर क्षेत्राला आर्थिक मदत द्या, शरद पवारांनी पंतप्रधानांना सुचवले सहा उपाय

महाराष्ट्राला अतिरिक्त एक लाख कोटी द्या, शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र, 10 हजार 500 कोटींचा हप्ता थांबवण्याचीही मागणी

बांधकाम क्षेत्राला मदत करा, शरद पवाराचं पंतप्रधान मोदींना चौथं पत्र

(Sharad Pawar writes letter to PM Narendra Modi expressing concern about Co-operative banks)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.