आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील जमीनदारासारखी – शरद पवार

काँग्रेसची आज दूरवस्था झाली असली तरी हा आजही रिलेव्हन्स असलेला पक्ष आहे. देशभर पसरलेला पक्ष आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ होतं तेव्हा युपीएसारखा प्रयोग झाला. पण आज काँग्रेसकडे केवळ चाळीसच जागा आहेच, असं पवार म्हणाले.

आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील जमीनदारासारखी - शरद पवार
शरद पवार, राहुल गांधी फाईल फोटो
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 10:45 PM

मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात तिसऱ्या आघाडीची तयारी सुरु असल्याच्या चर्चा मधल्या काळात सुरु होत्या. मात्र, भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसला डावलून चालणार नाही, असं राजकीय विश्लेषक सांगतात. अशावेळी आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाल्याचं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. पवार यांनी आज ‘मुंबई तक’ला सविस्तर मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसबाबत आणि देशातील एकूण राजकीय स्थितीबाबत भाष्य केलं. (Sharad Pawar’s opinion on the current situation of the Congress)

यूपीएचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे देण्यात यावं, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. राऊतांच्या या मागणीला महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांकडून जोरदार विरोध करण्यात आला. दुसरीकडे तिसऱ्या आघाडीसाठी अन्य विरोधी पक्षांमध्ये एकमत तयार होणं कठीण असल्याचं बोललं जातं. अशावेळी विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरुन मतभेद पाहायला मिळत आहेत. काँग्रेस नेते पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचंच नाव पुढे करतात. याबाबत विचारलं असता शरद पवारांनी उत्तर प्रदेशातील जमीनदारांचं एक उदाहरण दिलं.

पवारांनी सांगितली उत्तर प्रदेशातील जमीनदाराची कथा

‘उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या हजारो एकर जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. आता त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकदही त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनी आता 15-20 एकरवर आल्या आहेत. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही, असं सांगत पवारांनी काँग्रेसची आजची स्थिती विषद केली.

तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीपुढे काँग्रेसचं मोठं आव्हान?

काँग्रेसची आज दूरवस्था झाली असली तरी हा आजही रिलेव्हन्स असलेला पक्ष आहे. देशभर पसरलेला पक्ष आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ होतं तेव्हा युपीएसारखा प्रयोग झाला. पण आज काँग्रेसकडे केवळ चाळीसच जागा आहेच, असं पवार म्हणाले. त्यामुळे आजची काँग्रेस हेच तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीपुढचं सगळ्यात मोठं आव्हान असल्याचं पवारांनी एकप्रकारे सांगितलं आहे.

‘राजकीय रणनीतीकाराची गरज नाही’

मागील काही दिवसांपासून राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. शरद पवार पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी प्रशांत किशोर मोर्चेबांधणी करत आहेत, अशी एक चर्चा दिल्ली दरबारी सुरु असल्याबाबत पवारांना विचारण्यात आलं. त्यावेळी आपल्याला प्रशांत किशोर यांची मदत घ्यायची गरज नसल्याचं पवार म्हणाले. तसंच आपल्याला सत्तेत बसण्याचीही कुठली महत्त्वाकांक्षा नाही. पण विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचं राजकारण घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचं पवारांनी सांगितलं.

इतर बातम्या :

लोकशाही भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने, पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

नितेश राणे आणि नीलम राणे विरोधात लूकआऊट सर्क्युलर, गृहमंत्री वळसे-पाटील काय म्हणाले?

Sharad Pawar’s opinion on the current situation of the Congress

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.