कशाला बोलायचं, अनेकवेळा डिपॉझिट जप्त केलंय, शरद पवारांची पडळकरांवर पहिली प्रतिक्रिया

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या जहरी टीकेवर अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं.Sharad Pawars first reaction on Gopichand Padlkar

कशाला बोलायचं, अनेकवेळा डिपॉझिट जप्त केलंय, शरद पवारांची पडळकरांवर पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jun 27, 2020 | 1:04 PM

सातारा : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या जहरी टीकेवर अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं. सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी “गोपीचंद पडळकरांना काही महत्व देण्याची गरज नाही, त्यांचं अनेकवेळा डिपॉझिट जप्त केले आहे, कशाला बोलायचं” असं म्हणत टोलेबाजी केली. (Sharad Pawars first reaction on Gopichand Padlkars corona remark)

याशिवाय देवेंद्र फडणवीस हे काहीही बोलून प्रसिद्ध मिळवत आहेत, असं म्हणत त्यांनी फडणवीसांच्या मुलाखतीतील गौप्यस्फोटावर तिरकस निशाणा साधला. (Sharad Pawars first reaction on Gopichand Padlkars corona remark)

गोपीचंद पडळकरांवर भाष्य

शरद पवारांना गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर प्रतिक्रिया विचारली. त्यावर पवार म्हणाले, “पडळकरांना मी जास्त महत्त्व देत नाही. बारामतीत लोकसभा निवडणूक लढली, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं, विधानसभेची निवडणूक लढलं, तिथेही डिपॉझिट जप्त झालं. मग सांगलीत लोकसभा लढवली, तिथेही काही चाललं नाही. त्यामुळे काय बोलायचं” असं पवार म्हणाले.

विधानसभा, लोकसभा निवडणुकीसह इतर निवडणुकात लोकांनी डिपॉझिट जप्त केलं. ज्यांना लोकांनी बाजूला केलं, त्याची दखल कशाला घ्यायची, त्यांना काही महत्व देण्याची गरज नाही, असं पवार म्हणाले.

कोरोनाची काळजी घेतली तर काही होत नाही

कोरोनाबाबत योग्य काळजी घेतली तर काही होत नाही, मात्र तुम्ही एकत्र आले तर अडचण येते. राज्यातील फार लोक बाहेर गेले आहेत, मी ममता बॅनर्जी यांना फोन करुन येणाऱ्यांना बोलवा असं सांगितलं, व्यक्तिगत सबंध आहे, 160 ट्रेन राज्यातून गेल्या. आता पुन्हा कामगार, नागरिक, विद्यार्थी येऊ पाहत आहेत. लोकांना मदत करता आली, आता लोक पुन्हा येऊ लागले आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी भीती व्यक्त केली की मुंबई नको, असं शरद पवार म्हणाले.

चीनच्या कुरापती वाढल्या, पण संरक्षण मंत्र्यांचं अपयश नाही चीन कुरापत नक्कीच करत आहे. आपला रस्ता आपल्या हद्दीत घेण्याचा आहे. आपल्या भागात जाण्यासाठी रस्ता तयार केला, सियाचीन भागात महत्वाचा रस्ता आहे. 1993 मध्ये संरक्षण मंत्री असताना मी चीनला गेलो होतो. त्यावेळी बॉर्डरवरील सैन्य कमी करण्यावर चर्चा झाली होती. तत्कालिन पंतप्रधान नरसिंह राव यांनी नंतर करारा केले, तिथं गोळीबार होत नाही. गस्त घालताना काही होऊ शकतं, त्यामुळं लगेच संरक्षण मंत्र्यांना अपयश आले असे म्हणू शकत नाही, असं शरद पवार म्हणाले.

चीनने पूर्वीच भारतीय भूमीचा ताबा घेतला आहे. आज घेतला की नाही हे माहीत नाही. राष्ट्र सुरक्षा मुद्द्यात राजकारण आणू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

दररोज इंधन दरवाढ

इंधन दरवाढ दररोज होत आहे हे इतिहासात कधी पाहिलं नाही. सर्वसामान्य संकटात असताना अशा परिस्थितीत योग्य निर्णय अपेक्षित आहे. मात्र दरवाढीने इकॉनॉमीवर परिणाम होतोय, घरापर्यंत परिणाम होतो, असं म्हणत पवारांनी इंधन दरवाढीवर भाष्य केलं. लॉकडाऊन लोकं बोलत नाहीत म्हणून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे, असा आरोप त्यांनी सरकारवर केला.

राजू शेट्टींना विधानपरिषद राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेचं आश्वासन दिले होते, त्या अनुषंगाने राजू शेट्टी भेटले, असं पवारांनी सांगितलं.

तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतात

तीन पक्ष एकत्र असून, एकत्र बोलतात, एकत्र बसून निर्णय घेतला जातो, बाकी चर्चा करायची गरज नाही, असं म्हणत महाविकास आघाडीवर शरद पवारांनी भाष्य केलं.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले होते?

भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते.

पडळकरांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणं गोपीचंद पडळकर यांना भोवलं आहे (FIR against BJP MLA Gopichand Padalkar). राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत निषेध नोंदवला. दुसरीकडे बारामतीत गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकरांच्या या वक्तव्यावर त्यांच्याविरोधात दाखल झालेला हा राज्यातील पहिला गुन्हा आहे.

पडळकरांची ग्रँड एण्ट्री

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. ठिकठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांचं कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे. इतकंच नाही तर पंढरपुरात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. तर सांगलीत 100 गाड्यांच्या ताफ्यासह पडळकरांची एण्ट्री झाली.

शरद पवारांची पत्रकार परिषद

संबंधित बातम्या 

Gopichand Padalkar | शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar | पवारांवरील विधानानंतर गोपीचंद पडळकरांविरोधात पहिला गुन्हा दाखल 

Gopichand Padalkar | पडळकरांची ग्रँड एण्ट्री, 100 गाड्यांचा ताफा, प्रतिमेला दुग्धाभिषेक

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.