AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राणे आणि भुजबळांना शरद पवारांनी शिवसेनेतून फोडलं, रामदास कदम यांचा दावा

विधानसभेच्या तोंडावर कोकणात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

राणे आणि भुजबळांना शरद पवारांनी शिवसेनेतून फोडलं, रामदास कदम यांचा दावा
Follow us
| Updated on: Sep 05, 2019 | 11:41 AM

रत्नागिरी :  विधानसभेच्या तोंडावर कोकणात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत रामदास कदम यांनी, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि भाजपचे सहयोगी खासदार नारायण राणेंना (Narayan Rane) शिवसेनेतून फोडण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात असल्याचा दावा केला आहे.

नारायण राणे यांना शिवसेनेतून काँग्रेसने नव्हे तर शरद पवारांनी फोडलं, असा दावा कदम यांनी केला.

नारायण राणे, शरद पवार आणि राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार बाबासाहेब कुपेकर यांची पहिली बैठक कोल्हापुरात झाली होती. मात्र अपेक्षित मंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळे राणे दिल्लीत काँग्रेसच्या दरबारी गेले, असं रामदास कदम यांनी सांगितलं.

शरद पवार यांनी सत्तेत असताना जे केलं तेच चित्र आता त्यांना पाहायला मिळतंय. शिवसेनेचे आमदार फोडण्याचे काम शरद पवारांनी केलं .भुजबळांना शिवसेनेतून फोडण्यामागे शरद पवार यांचाच हात होता. ज्यांनी बाळासाहेबांना दु:ख दिलं ते सर्व भुईसपाट होत आहेत, असं रामदास कदम म्हणाले.

यावेळी रामदास कदम यांनी नारायण राणेंचा खरपूस समाचार घेतला. नारायण राणे आता कुठल्या पक्षात जाणार याची मला माहिती नाही, मात्र राणेंनी आता रामदास आठवले यांच्याकडे संपर्क साधावा, असा टोला कदम यांनी लगावला.

नारायण राणे यांना शिवसेनेत घेण्यास शिवसैनिकांचा प्रचंड विरोध आहे. भाजपमध्ये ते गेले तर युती करायची की नाही याबाबत सुद्धा शिवसैनिकांच्या मनात खदखद आहे. भाजपनेही राणेंना पक्षात घेऊ नये अशी शिवसैनिकांची भावना आहे, असं रामदास कदम म्हणाले.

युती होणारच

दरम्यान शिवसेना आणि भाजप युती होणार. त्यासाठी अडीज अडीज वर्षाचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजपचा अडीज वर्ष आणि शिवसेनेचा अडीज वर्ष मुख्यमंत्री होईल. भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात अशी चर्चा झाली आहे, असं रामदास कदम म्हणाले.

ही युती होऊ नये म्हणून अनेक जण देव पाण्यात बुडवून आपली पोळी कशी भाजता येईल याची चाचपणी करत आहे, असा आरोप कदम यांनी केला.

'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.