Sharad Pawar | ‘आम्ही नेहमी राजकीय चपला…’ कुटुंबातील लढाईवर शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांचं थेट भाष्य
Sharad Pawar | सध्या सगळ्या राज्याच लक्ष बारामीतकडे लागल आहे. कारण बारामती म्हणजे शरद पवार, अजित पवारांचा बालेकिल्ला. आधी बारामतीमधून पवार कुटुंबातून उभा राहणारा उमेदवार सहज निवडून यायचा. पण यावेळी पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. कुटुंबातच राजकीय लढाई रंगणार आहे. त्यामुळे जनता काकाला साथ देणार की, पुतण्याला ते लवकर कळेल.
कोल्हापूर : “गट फुटला म्हणून पवार कुटुंबात फूट पडलेली नाही. निवडणुकीनंतर जे निवडून येतील ते येतील. आम्ही नेहमी राजकीय चपला बाहेर काढून आता येतो. एनडी पाटील आणि शरद पवार हे दोन्ही अत्यंत डावे-उजवे लोक होते. पण कधीही राजकारण घरात आणलं नाही. एनडी पाटील राजाराम बापूंविरुद्ध निवडणुकीत उभे राहिले, तेव्हा त्यांच्याकडे पैसा नव्हता. त्यावेळी माझ्या आईने प्रचारासाठी त्यांना 10 हजार रुपये दिले होते. राजकारण घरात आणलं नाही. आम्ही एकाच ताटात जेवतो” असं सरोज पाटील म्हणाल्या. त्या शरद पवार यांच्या भगिनी आहेत.
“शरद पवारांच स्वत:च्या ताटापेक्षा बहिणीच्या, एनडीच्या ताटात काही कमी आहे का? याकडे लक्ष असतं. या सुस्कृत कुटुंबात असं काही होणार नाही. राजकारणात एनडी पाटील शरद पवारांवर प्रखर टीका करायचे. आम्हाला ती सवय आहे. शरद पवार काँग्रेस तर आई शेकाप पक्षात होती. डाव्या विचारसरणीचे लोक यायचे. यशवंतराव चव्हाणांसारखे पुढारीपण यायचे. पण म्हणून त्याचा घरावर परिणाम झाला नाही” असं सरोज पाटील म्हणाल्या.
‘डोळ्यात पाणी हे दुबळेपणाचा लक्षण’
‘अजित काय बोलला? श्रीनिवास काय बोलला? हे राजकारणापुरता आहे. इलेक्शन संपलं की ढग निघून जातील’ असं त्या म्हणाल्या. सध्या जे राजकारण सुरु आहे, त्या बद्दल दु:ख, अत्यंत वाईट वाटत असं सरोज पाटील म्हणाल्या. “आईने शिकवलय रडत बसायच नाही. डोळ्यात पाणी हे दुबळेपणाचा लक्षण आहे. सुवर्णकाळ आम्ही बघितलाय असं त्या म्हणाल्या. भाजपाचा सगळा रोख शरद पवारांकडे आहे. हा माणूस खल्लास केला, की राज्य आपल्याकडे असं त्यांना वाटतं” अशी टीका त्यांनी भाजपावर केली.
‘अजित संवेदनशील आहे’
“अजित पवारांचा तोल कसा सुटला ते माहित नाही. अजित संवेदनशील आहे. कदाचित अजितला आता पश्चाताप झाला असेल” असं त्या म्हणाल्या. “सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोघींपैकी कोण विजयी होईल असं तुम्हाला वाटतं, त्यावर सरोज पाटील म्हणाल्या की, मी शिक्षिका आहे. माझं दोघींवर प्रेम आहे”