Sanjay Raut : भाजप क्या करती है, ईडी को आगे करती है, ईडीची धाड पडताच शिवसैनिकांची राऊतांच्या घराबाहेर घोषणाबाजी; शिवसेनेचं ठिय्या आंदोलन सुरू
संजय राऊतांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले असून त्यांनी कारवाईला सुरूवात केल्याची बातमी कळताच आता शिवसैनिकांनी राऊतांच्या घराकडे धाव घेत आहेत. राऊतांच्या घराबाहेर शिवसेनेने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याठिकाणी शिवसैनिकांकडून भाजप क्या करती है, ईडी को आगे करती है, ईडीची धाड पडताच शिवसैनिकांची राऊतांच्या घराबाहेर घोषणाबाजी सुरू आहे.
मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी आज सकाळी ईडीचे पथक दाखल झाल्यावर एकच गोंधळ उडालायं. विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी अशाप्रकारची कारवाई केली जातंय, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातोयं. आता ईडीच्या (ED) या कारवाईचा विरोध आणि निषेध करण्यासाठी शिवसैनिक राऊतांच्या घराच्या बाहेर जमण्यास सुरूवाच झालीयं. इतकेच नव्हेतर शिवसैनिकांनी त्याठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यासही सुरूवात केलीयं. शिवसेनेच्या नेत्यांसोबत आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नेत्यांच्याही प्रतिक्रिया येण्यास सुरू झालीयं. मात्र, राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यासही सुरूवात केलीयं.
भाजप क्या करती है, ईडी को आगे करती है शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी सुरू
संजय राऊतांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले असून त्यांनी कारवाईला सुरूवात केल्याची बातमी कळताच आता शिवसैनिकांनी राऊतांच्या घराकडे धाव घेत आहेत. राऊतांच्या घराबाहेर शिवसेनेने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याठिकाणी शिवसैनिकांकडून भाजप क्या करती है, ईडी को आगे करती है, ईडीची धाड पडताच शिवसैनिकांची राऊतांच्या घराबाहेर घोषणाबाजी सुरू आहे. ईडीच्या धाडीवर बोलताना शिवसैनिक म्हणाले की, ही कारवाई अत्यंत चुकीची आहे. विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी अशाप्रकारची कारवाई केली जात आहे. जे शिवसेनेतून बाहेर पडले त्यांच्यावर अगोदर ईडीची कारवाई सुरू होती. मात्र, जसेही ती शिवसेनेतून बाहेर पडले की, त्यांच्यावरील कारवाई बंद झाली हे सर्व विचार करण्यासारखेच आहे.
राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी, शिवसेनेचं ठिय्या आंदोलन सुरू
राऊतांच्या घराबाहेर अजून गर्दी होण्याची शक्यता आहे. हळूहळू करून शिवसैनिक ईडीच्या कारवाईचा विरोध करण्यासाठी जमा होताना दिसत आहेत. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडल्याचे चित्र बघायला मिळते आहे. यासर्व प्रकरणावर दीपक केसरकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाली की, कोणतीही कारवाई ही पुराव्याशिवाय होत नाही. ईडीच्या हाती नक्कीच काहीतरी लागले असेल तेंव्हाच ही कारवाई सुरू आहे. या कारवाईवर शिवसेनेच्या गटातूनही अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अरविंद सावंतांनीही या कारवाईचाविरोध केला असून त्यांनी थेट भाजपावर निशाना साधला आहे.