Attack on Shiv Sena Activist | शिवसेना कार्यकर्त्यावर कणकवलीत तलवारीनं हल्ला! हल्ल्यामागे राणेंचा हात?
एका इनोव्हा कारनं संतोष परब यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यानंतर गाडीतून दोन अज्ञात व्यक्ती उतरले. त्यांच्या हातात असलेल्या धारदार शस्त्रानं संतोष परब यांच्यावर वार करण्यातक आले. हल्ला करुन मारेकऱ्यांनी कनेडीच्या दिशेनं पळ काढला.
सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कणकवली (Kankavali) तालुक्यात असलेल्या करंजे (Karanje) गावचे माजी सरपंच संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संतोष परब जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. संतोष परब हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे (District bank) अध्यक्ष आणि शिवसेना नेते सतीश सावंत (Satish Sawant) यांचे निकववर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांचे खंदे समर्थक असलेल्या संतोष परब यांच्यावर कणकवली शहरात करण्यात आलेल्या हल्ल्यानं जिल्ह्यातील राजकारण (Politics) ढवळून निघालंय. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याची शंका उपस्थित केली जाते आहे.
पालकमंत्री जखमी शिवसैनिकांच्या भेटीला
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी हल्ल्यात जखमी झालेल्या शिवसैनिकाची भेट घेतली. कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये जखमी शिवसैनिकावर उपचार केले जात आहेत. यावेळी उदय सामंत यांनी या हल्ल्याचा निषेध करताना पोलिसांना चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे. हल्ला करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या कानावरही हा सगळा प्रकार घातल्याचं त्यांनी म्हटलंय.
हल्ल्यामागे राणेंचा हात?
दरम्यान, या हल्ल्यामागे नितेश राणेंचा (Nitesh Rane) हात असल्याचा आरोप स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही वैभव नाईकांनी दिलाय. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेच चांगलं काम केल्यानं नितेश राणेंच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचं वैभन नाईक यांनी म्हटलंय. संतोष परबांवर हल्ला करुन जिल्हा बँकेसारख्या सहकार निवडणुकीत राणे दहशत निर्माण करत असल्याचा आरोप वैभव नाईकांना केलाय. राणेंच्या या दहशतीला चोख प्रत्युतर शिवसेना नक्कीच देईल, असा इशाराही यावेळी त्यांनी बोलताना दिलाय.
असा झाला हल्ला…
नंबर प्लेट नसलेल्या एका इनोव्हा कारनं संतोष परब यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यानंतर गाडीतून दोन अज्ञात व्यक्ती उतरले. त्यांच्या हातात असलेल्या धारदार शस्त्रानं संतोष परब यांच्यावर वार करण्यातक आले. हल्ला करुन मारेकऱ्यांनी कनेडीच्या दिशेनं पळ काढला. हा सगळा हल्ला नितेश राणे आणि त्यांचे सहकारी गोट्या सावंत यांनीच घटवन आणल्याचा आरोपा सतीश सावंत यांनी केलाय. दरम्यान, या हल्ल्याप्रकरमी नितेश राणेंना अटक केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा शिवसेना आंदोलन करेल, असा इसाशाही सतीश सावंतांनी दिलाय.
इतर बातम्या –
..तर अमित शाहांच्या कार्यक्रमस्थळी आंदोलन करणार, पुण्यातील शिवसैनिकांचा इशारा
शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्याला कर्नाटक सरकारच जबाबदार; एकनाथ शिंदेंचा इशारा
रामदास कदमांचा अनिल परबांवर हल्लाबोल, आता अनिल परब आणि शिवसेना नेत्यांची भूमिका काय?
बंगळुरूतील त्या समाजकंटकांना शोधून काढा, अजित पवार, जयंत पाटलांचा कर्नाटकला इशारा