Thane Shivsena : शिवसेनेच्या शाखांना टाळे लावायला माणूस उरणार नाही, कारवाईनंतर माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा टोला
शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी यावेळी पक्षातील वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, 'पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनीच पक्ष संपवायला घेतला असून आमची पदे काढून घेतली असली, तरी आमचे शिवसैनिक पद कुणीच काढून घेऊ शकत नाही, असंही शिंदे यावेळी म्हणाल्या. यामुळ शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्याचं दिसतंय.
ठाणे : शिवसेनेतून (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट बाहेर पडल्यानं त्यांचे समर्थकही राजीनामा देत असल्याचं चित्र राज्यभरात दिसतंय. तर बंडखोर गटाचं समर्थन करणाऱ्यांचा राजीनामा घेतला जात असल्याचा प्रकार ठाण्यातून समोर आलाय. यावर शिंदे समर्थक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे (Minakshi Shinde) यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारे पक्षातून काढत रहाल तर ठाण्यात शिवसेनेच्या कार्यालयांना कुलूप लावायला शिवसेनेकडे माणूस शिल्लक राहणार नाही, असं शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या मीनाक्षी शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेतील नाराजी वाढत असून पालिकास्तरावर देखील नाराजी पसरल्याचं दिसतंय. तर हेच चित्र राज्यातही असून अनेक ठिकाणी बंडखोरांच्या समर्थनार्थ मोर्चे देखील निघाले आहेत. यामुळे शिंदे समर्थक आणि शिवसेना यांच्यातील दुफळी वाढत आहे.
‘पक्ष संपवायचाय का?’
शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी नाराजी व्यक्त करताना म्हटलंय की, ‘ शिवसेनेतील नेते अजून किती पदाधिकाऱ्यांना पक्षातून हकालपट्टी करणार आहेत, असा सवाल उपस्थित करत पक्षातून कार्यकर्त्यांना काढण्याचं सत्र असंच सुरु राहिलं तर शिवसेना शाखांना टाळं लावायला माणूस उरणार नाही, अशी तिखट प्रतिक्रिया शिंदे समर्थक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे.
वरिष्ठांवर नाराजी
शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी यावेळी पक्षातील वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनीच पक्ष संपवायला घेतला असून आमची पदे काढून घेतली असली, तरी आमचे शिवसैनिक पद कुणीच काढून घेऊ शकत नाही, असंही शिंदे यावेळी म्हणाल्या.
नरेश म्हस्के यांच्याबरोबरच मिनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांचे उघडपणे समर्थन करत जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे ओळखले जातात. जिल्ह्यात त्यांचा मोठा दबदबा आहे. त्यामुळेच त्यांच्या बंडानंतर जिल्ह्यात शिवसेनेत फुट पडण्याची शक्यता वर्तविली जात होती. मिनाक्षी शिंदे यांनी टेंभीनाक्यावर शक्तीप्रदर्शन करत शिंदे समर्थक असल्याचे स्पष्ट केले. यामुळे शिवसेनेत मोठी फुट पडल्याचे चित्र आहे.
कुणाची हकालपट्टी?
मिनाक्षी शिंदे या ठाण्याच्या माजी महापौर असून त्या आक्रमकपणे भुमिका मांडणाऱ्या नगरसेविका आहेत. शिंदे समर्थक असल्यानं त्यांची हकालपट्टी करण्यात आली. एकनाथ शिंदेंनी ठाणे जिल्ह्यात अनेक मोठे काम केले आहेत. त्यामुळे त्यांचे असंख्या समर्थक आहेत. दरम्यान, अशा प्रकारे पक्षातून काढल्यास शिवसेना शाखांना टाळे लावायला माणूस शिल्लक राहणार नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.