Shiv Sena : तीन आमदार, एक खासदार तरीही भाजपने वरळीतील मैदान मारलं; शिवसेनेकडून नेत्यांची कानउघाडणी

Shiv Sena : वरळी जांबोरी मैदानात मुंबई भाजपने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाचे प्रकरण शिवसेना अंतर्गत तापले आहे. काल सायंकाळी वरळीतील शिवसेना नेत्यांना शिवसेना भवनात बोलवण्यात आले होते.

Shiv Sena : तीन आमदार, एक खासदार तरीही भाजपने वरळीतील मैदान मारलं; शिवसेनेकडून नेत्यांची कानउघाडणी
तीन आमदार, एक खासदार तरीही भाजपने वरळीतील मैदान मारलं; शिवसेनेकडून नेत्यांची कानउघाडणीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 2:03 PM

मुंबई: वरळीतील जांबोरी मैदानावर भाजपने (bjp) दहीहंडी उत्सवाचे आयोजन केलं आहे. दरवर्षी शिवसेनेचे आमदार सचिन अहिर या मैदानावर दहीहंडीचं आयोजन करत असतात. मात्र, पहिल्यांदाच भाजपने आता हे मैदान मिळवल्याने शिवसेनेत (shivsena) अस्वस्थता निर्माण झाली आहे. वरळीत शिवसेनेचे तीन आमदार आहेत. एक खासदार आहे. माजी महापौर याच परिसरात राहतात. तरीही शिवसेनेला जांबोरी मैदान मिळवता आलं नाही. त्याची दखल शिवसेना नेतृत्वाने घेतली असून शिवसेना नेत्यांची कान उघाडणी केली आहे. शिवसेनेचे खासदार आणि सचिव अनिल देसाई (anil desai) यांनी या नेत्यांची कानउघाडणी केली आहे. मैदान खराब होऊ नये म्हणून हे मैदान घेतलं नसल्याचं कारण या नेत्यांनी दिलं आहे. मात्र, महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने आणि थेट आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच भाजपने हा उत्सव आयोजित केल्याने शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

वरळी जांबोरी मैदानात मुंबई भाजपने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाचे प्रकरण शिवसेना अंतर्गत तापले आहे. काल सायंकाळी वरळीतील शिवसेना नेत्यांना शिवसेना भवनात बोलवण्यात आले होते. यावेळी जांबोरी मैदानात पक्षाचा दहीहंडी उत्सव आयोजित करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी दाखवलेल्या उदासीनतेबद्दल पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यंदा आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदार संघात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात मुंबई भाजपने बाजी मारली आहे. मोक्याचे जांबोरी मैदान दहीहंडी उत्सवासाठी पटकावल्याने शिवसेनेवर नामुष्की ओढावली आहे. त्यामुळेच शिवसेना नेत्यांची ही कानउघाडणी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

शाखा प्रमुखांची आज बैठक

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचाराची हंडी वरळीतून फुटणार आहे. नवनियुक्त मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी महापालिका निवडणुकीसाठी व्यूहरचना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरळीत भव्य दहीहंडी आयोजित करून शिवसेनेला डिवचले आहे. दरम्यान, स्थानिक शिवसेना नेत्यांच्या कानउघाडणी नंतर वरळीत काल रात्री शाखाप्रमुखांची बैठक पार पडली. आज सायंकाळीही वरळीत शाखाप्रमुखांची बैठक होणार आहे. यात नव्या जागेचा शोध घेणे आणि भाजपपेक्षाही मोठी दहीहंडी करण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शेलारांचं डिवचणं सुरूच

दरम्यान, दहीहंडी उत्सवावरून आशिष शेलार यांचं शिवसेनेला डिवचणं सुरूच आहे. आम्ही शिवसेनेचा गड वगैरे मानत नाही. आदित्य ठाकरे हे युतीतून निवडून आले होते. त्यामुळे गड वगैरेवर आमचा विश्वास नाही. कुणी गड ठरवला? कुणी अधिकार दिला? शेलारमामांशिवाय गड कोण ठरवू शकतो? असा सवाल करतानाच जांबोरी मैदान तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है, अशा शब्दात शेलार यांनी शिवसेनेला डिवचले आहे.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.