AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Election 2022: सचिन भाऊ अंगार है, बाकी सब भंगार है, निकालाआधीच सचिन अहिरांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

सचिन अहिर यांचे कार्यकर्ते विजयाआधीच घोषणाबाजी करत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात सचिन भाऊ, सचिन भाऊ ओरडत आहेत. तसेच 'सचिन भाऊ अंगार है, बाकी सब भंगार है. कोण कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला. सचिन भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा लगातार कार्यकर्त्यांकडून सुरु आहेत.

MLC Election 2022: सचिन भाऊ अंगार है, बाकी सब भंगार है, निकालाआधीच सचिन अहिरांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
निकालाआधीच सचिन अहिरांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 8:19 PM

मुंबई : विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान (Voting) पार पडलं. आता सर्वांचेच लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपलाच नेता जिंकणार असा विश्वास आहे. असाच विश्वास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाबाहेर घोषणाबाजी (Slogan) सुरु केली आहे. ‘सचिन भाऊ अंगार है, बाकी सब भंगार है’ असा घोषणा कार्यकर्ते देत आहेत. सचिन अहिर यांचा विजय पक्का असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीतून व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांमध्ये फुल जोश पहायला मिळत आहे.

शिवसेनेतर्फे सचिन अहिर आणि आमशा पाडवी रिंगणात आहेत. सचिन अहिर यांचे कार्यकर्ते विजयाआधीच घोषणाबाजी करत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात सचिन भाऊ, सचिन भाऊ ओरडत आहेत. तसेच ‘सचिन भाऊ अंगार है, बाकी सब भंगार है. कोण कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला. सचिन भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा लगातार कार्यकर्त्यांकडून सुरु आहेत.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान पार पडले. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची ठरली आहे. या 10 जागांसाठी एकूण 285 आमदारांनी मतदानाचा हक्का बजावला आहे. प्रत्येक उमेदवाराल जिंकण्यासाठी 26 मतांची गरज आहे. सायंकाळी दोन तास उशिराने मतमोजणीला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात सर्व चित्र स्पष्ट होईल. निवडणुकीत भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड रिंगणात आहेत. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप तर राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे रिंगणात आहेत. (Shiv Sena candidate Sachin Ahirs activists started shouting slogans outside the Vidhan Bhavan)

हे सुद्धा वाचा

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.