ED, CBI : ईडी, सीबीआयच्या वापरावरून शिवसेनेची सर्वपक्षीय बैठकीत तक्रार, सरकारं पाडण्यासाठी यंत्रणांचा वापर, शिवसेनेचा आरोप

आता तपास यंत्रणावरून पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. तसेच महाराष्ट्रातील सरकारही भाजपने तपास यंत्रणांचा वापर करून पाडल्याचाच आरोप शिवसेनेकडून वारंवार करण्यात आला आहे. आज तोच सूर दिल्लीतही बघायला मिळाला आहे.

ED, CBI : ईडी, सीबीआयच्या वापरावरून शिवसेनेची सर्वपक्षीय बैठकीत तक्रार, सरकारं पाडण्यासाठी यंत्रणांचा वापर, शिवसेनेचा आरोप
खा. संजय राऊतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 5:24 PM

नवी दिल्ली : संसदेच अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. यासाठी दिल्लीत एक सर्वपक्षीय बैठक पार पडली आहे. या सर्व पक्ष बैठकीत शिवसेनेकडून मात्र वेगळीच तक्रार करण्यात आली आहे. ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) सारख्या यंत्रणाबद्दल शिवसेनेने या बैठकीत तक्रार केली आहे. भाजप विरहित सरकार पाडण्यासाठी या यंत्रणाचा वापर होतोय, अशी भूमिका या बैठकीत शिवसेना खासदारांनी मांडली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत हे या बैठकीला उपस्थित होते, तपासी यंत्रणांच्या वापराबाबात शिवसेनेने बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे, त्यामुळे आता तपास यंत्रणावरून पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. तसेच महाराष्ट्रातील सरकारही भाजपने तपास यंत्रणांचा वापर करून पाडल्याचाच आरोप शिवसेनेकडून वारंवार करण्यात आला आहे. आज तोच सूर दिल्लीतही बघायला मिळाला आहे.

अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा फेरा

महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या मागे गेल्या काही महिन्यात चौकशीचा फेरा लागलेला आहे. ईडीने चौकशी केल्यानंतरच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती, तर ईडीच्या चौकशीनंतरच माजी मंत्री नवाब मलिके हे जेलमध्ये गेले होते. तेव्हाही ईडी आणि सीबीआय वरून अनेक आरोप झाले होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांचं बंड झाल्यानंतर अनेक आमदारांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवूनच गुजरात आणि गुवाहाटीला नेण्यात आलं आणि या तपास यंत्रणांचा वापर करूनच महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यात आलं, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता.

सरकार पडल्यानंतर विरोधकांची पहिलीच बैठक

महाराष्ट्रातलं सरकार पडल्यानंतर दिल्लीत सर्व पक्षांची होणारी ही पहिलीच बैठक होती आणि शिवसेनेची सरकार पडल्याची खदखद या बैठकीत दिसून आलेले आहे. तर शिवसेनेचे आरोप भाजपकडून वारंवार फेटाळून लावण्यात आलेले आहेत, शिवसेनेकडे आता टीका करण्यासारखं काही उरलं नाही म्हणून असे आरोप केले जात आहेत. असा पलटवार भाजपकडून करण्यात आला आहे, तसेच तपास यंत्रणांच्या कामांमध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप नाही, असेही वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीकडूनही याबाबत अनेकदा आरोप करण्यात आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांचीही ईडीकडून चौकशी झाली आहे. तसेच संजय राऊत यांच्या मालमत्ताही ईडीकडून जप्त करण्यात आल्या होत्या. त्यावरूनही बरेच राजकारण तापलं होतं. आता पुन्हा तेच होताना दिसतंय.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.