Eknath Shinde: ‘शिवसेनेचे वीर ‘धर्म’ विसरले’ सामनाच्या हेडलाईनमधून एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणि कारवाईला घाबरून शिंदे यांच्यासोबत गद्दार आमदार सुरतला पळाल्याची टीका करण्यात आली आहे.

Eknath Shinde: 'शिवसेनेचे वीर 'धर्म' विसरले' सामनाच्या हेडलाईनमधून एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण
एकनाथ शिंदे Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 7:43 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या या बंडाचा ‘सामना’तून (samna) समाचार घेण्यात आला आहे. शिवसेनेचे (shivsena) वीर ‘धर्म’ विसरले असा घणाघात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून शिंदेंवर करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री गुजरातच्या भूमीवरून थेट महाराष्ट्रावर घाव घालण्याचा प्रयत्न केला. भाजपने टाकलेल्या या जाळ्यात शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे सहज फसले. ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणि कारवाईला घाबरून शिंदे यांच्यासोबत गद्दार आमदार सुरतला पळाले. केंद्रात असेल्या सत्तेच्या जोरावर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ता हातात असल्याने महाविकास आघाडीमधील नेत्यांना खोट्या आरोपांखाली अडकले जात आहे. राज्य सरकारची पर्यायाने महाराष्ट्राची बदनामी भाजपकडून सुरू असल्याची टीका आजच्या सामना हेडलाईनमधून करण्यात आली आहे.

नेमकं काय म्हटलंय सामनामध्ये?

भाजपकडून सातत्याने राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र त्यात यश न आल्याने सत्तेचा उपयोग करून  ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव निर्माण करून महाविकास आघाडीमधील नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातही यश न आल्याने सोमवारी मध्यरात्री गुजरातच्या भूमीवरून थेट महाराष्ट्रावर घाव घालण्याचा प्रयत्न झाला. भाजपने टाकलेल्या या जाळ्यात शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे सहज फसले. ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणि कारवाईला घाबरून शिंदे यांच्यासोबत गद्दार आमदार सुरतला पळाले, असा घणाघात शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

 ‘हिंदुत्त्वासोबत फारकत नाही’

दरम्यान दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी बंडोखोरी केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल 35 आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. या आमदारांचा फोटो देखील व्हयरल झाला आहे. मोठ्या संख्येने आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मात्र त्याचसोबत आपण शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदुत्त्वासोबत फारक घेणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.