दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला? शिवसेना आज उचलणार ‘हे’ महत्त्वाचं पाऊल

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी शिवसेना आग्रही, आज जी नॉर्थ वॉर्डमध्ये शिवसेनेचं शिष्टमंडळ धडकणार, परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेचा आता आक्रमक पवित्रा

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला? शिवसेना आज उचलणार 'हे' महत्त्वाचं पाऊल
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 8:07 AM

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी (Dussehra Melawa) शिवाजी पार्क (Shivaji Park) कुणाला मिळावं यासाठी ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येतेय. दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर परवानगी मिळावी, यासाठी शिवसेना (Shiv Sena Latest News) आता आक्रमक झाली आहे.

शिवसेनेचं शिष्टमंडळ आज परवानगीसाठी जी नॉर्थ वॉर्डमध्ये धडकणार आहे. यावेळी जी नॉर्थ वॉर्डमध्ये अधिकाऱ्यांची शिवसेना शिष्टमंडळ भेट घेईल. यावेळी महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे परवानगी मिळाली नाही, तर शिवसेना हायकोर्टात जाणार आहे. दरम्यान, हायकोर्टातूनही परवानगी मिळाली नाही, तर शिवाजी पार्कमध्ये घुसून दसरा मेळावा करण्याच्या तयारीत शिवसेना असल्याचंही सांगितलं जातंय.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर आपणच खरी शिवसेना आहोत, असा दावा केला आहे. त्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी, बाळासाहेबांच्या विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी आपणही दसरा मेळावा घेणार आहोत, अशी भूमिका स्पष्ट केली होती. इतकंच नव्हे, तर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याबाबतही शिंदे गट आग्रही अशल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलंय.

दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेच्या वतीने शिवाजी पार्कच्या मैदानाची परवानगी अद्याप कुणालाही देण्यात आलेली आहे. अर्जांची छाननी, पाहणी, अहवाल मागवणं, अशी प्रक्रिया सध्या सुरु असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आज जी-नॉर्थ वॉर्डमध्ये शिवसेनेचं शिष्टमंडळ नेमकं पालिकेत आपलं काय म्हणणं मांडतं हे महत्त्वाचं. मात्र शिवाजी पार्क मैदानवर परवानगी मिळावी, यासाठी आक्रमकपणे शिवसेनेचा आज पालिका कार्यालयात जाईल, हे स्पष्ट आहे.

कुठूनच परवानगी मिळाली नाही तर..?

पालिकेकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली नाही, तर शिवसेना कोर्टातही जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. शिवसेना नेते अनिल परब यांनी तसं याआधीही माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. दरम्यान, आता समोर आलेल्या माहितीनुसार, जर पालिका आणि हायकोर्ट, यापैकी कुणाकडूनही जरी परवानही मिळाली नाही, तरिही शिवतीर्थावर घुसून दसरा मेळावा घेतला जाईल, अशी आक्रमक भूमिका सध्या शिवसेनेच्या वतीने घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

शिवसेनेची स्थापना झाल्यापासून दरवर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर दसरा मेळाव्याचं शिवसेनेच्या वतीने आयोजन केलं जातं. विशेष म्हणजे शिवाजी पार्कवरच आतापर्यंतचा दसरा मेळावा पार पडलेला आहे. मात्र महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळवताना शिवसेनेला आव्हानांचा सामना करावा लागतोय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.