शिवसेना आमचा खरा मित्र, त्यांनी आम्हाला वाईट काळातही साथ दिली : अमित शाह
मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे. युतीची घोषणा करताना […]
मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे.
युतीची घोषणा करताना जवळपास संपूर्ण मंत्रीमंडळ उपस्थित होतं. भाजपाध्यक्षांपासून ते राज्यातल्या मंत्र्यांपर्यंत सर्वांनी या क्षणाला उपस्थिती लावली. अमित शाहांनी ही कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या मनातलही भावना असल्याचं सांगतच शिवसेना हा आपला खरा मित्र असल्याचंही सांगितलं आणि मैत्री राजकारणाच्या पलिकडची असल्याचं स्पष्ट केलं.
अमित शाह म्हणाले, “शिवसेना आणि भाजपने एकत्र यावं ही कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा होती. शिवसेना आमचा खरा मित्र आहे. अकाली दल आणि शिवसेना हे दोघे भाजपचे खरे मित्र आहेत. त्यांनी आम्हाला परिस्थिती चांगली असो की वाईट, सर्व प्रसंगांमध्ये साथ दिली.”
युतीवर मोदींची प्रतिक्रिया
या युतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नातून साकारलेली ही युती यापुढेही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी काम करत राहणार आहे. शिवसेनेसोबत आमची मैत्री ही राजकारणाच्या पलिकडची आहे. देशाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिवसेनेमुळे एनडीए आणखी मजबूत होईल आणि महाराष्ट्रात ही युती एकमेव निवड असेल, अशी प्रतिक्रिया मोदींनी ट्विटरवर दिली.
व्हिडीओ पाहा