2024पर्यंत उद्धव ठाकरेंकडे फक्त काही लोक शिल्लक उरतील; बावनकुळेंचं भाकीत की…

| Updated on: Sep 08, 2022 | 5:35 PM

आमचे कार्यकर्ते नाराज नाहीत. आमच्याकडे स्पर्धा नाही. आमच्याकडे येणारे कार्यकर्ते राष्ट्रासाठी येतात. पदासाठी नाही, असंही ते म्हणाले. राज ठाकरे यांना सुद्धा त्यांची संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. मनसे-भाजप युतीची आज काही चर्चा नाही.

2024पर्यंत उद्धव ठाकरेंकडे फक्त काही लोक शिल्लक उरतील; बावनकुळेंचं भाकीत की...
2024पर्यंत उद्धव ठाकरेंकडे फक्त काही लोक शिल्लक उरतील; बावनकुळेंचं भाकीत की...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर: शिवसेनेचे (shivsena) जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे (rajesh wankhede) यांनी पाच हजाराहून अधिक शिवसैनिकांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकप्रकारे अमरावतीतील संपूर्ण शिवसेनाच भाजपमध्ये आली आहे. अजूनही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीपर्यंत तुम्हाला हे चित्रं दिसेलच, असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांच्याकडे 2024पर्यंत फक्त काही लोक शिल्लक राहतील, असं भाकीतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी वर्तवलं आहे. त्यामुळे बावनकुळेंचं हे भाकीत आहे की यामागे भाजपची काही गणितं आहेत? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांनी हजारो शिवसैनिकांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे भाकीत केलं आहे. शिवसेनेचे अमरावती उपजिल्हाप्रमुख प्रदीप गौरखेडे, प्रदीप तेलखेडे आणि संजय देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला आहे. राजेश वानखेडे यांच्यासह पाच हजार शिवसैनिक आणि 20 महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वानखेडे यांच्या प्रवेशानंतर भाजपने त्यांची तात्काळ भाजपच्या अमरावती लोकसभा मतदारसंघाचे संयोजक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपला बळ मिळेल

वानखेडे यांच्या पक्षप्रवेशानंतर मीडियाशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे भाकीत केलं. राजेश वानखेडे यांच्या नेतृत्त्वात चालणारी अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना भाजपात आलीय. राजेश वानखडे यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत त्यांना 66 हजार मतं मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने भाजपला बळच मिळेल, असं बावनकुळे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेला खिंडार पडणार

वानखेडे यांच्यानंतर लवकरच संपूर्ण अमरावती लोकसभा, तिवसा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करतील. शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी भाजपच्या संपर्कात आहेत. गेल्या अडीच वर्षांच्या सरकारला सर्वच जण कंटाळलेले आहेत. पण आता जनतेच्या मनातलं हे सरकार आहे. प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडणार आहे, असा दावा त्यांनी केला.

आश्चर्यचकित व्हाल असे प्रवेश होतील

उद्धव ठाकरेंकडे असलेले कार्यकर्ते शिंदे गटात आणि भाजपात येत आहेत. 2024पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच लोक शिल्लक राहतील. विदर्भातील एकही कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार नाही, असंही ते म्हणाले. आपण आश्चर्यचकित व्हाल असे प्रवेश भाजपमध्ये होणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह उद्धव ठाकरेंकडे काहीच व्हिजन नाही. पुढच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभा निवडणूक लढवायला देखील उमेदवार मिळणार नाहीत. एवढे प्रवेश भाजपमध्ये होणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

मनसे-भाजप युतीची चर्चा नाही

आमचे कार्यकर्ते नाराज नाहीत. आमच्याकडे स्पर्धा नाही. आमच्याकडे येणारे कार्यकर्ते राष्ट्रासाठी येतात. पदासाठी नाही, असंही ते म्हणाले. राज ठाकरे यांना सुद्धा त्यांची संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. मनसे-भाजप युतीची आज काही चर्चा नाही. जसजसा काळ पुढे जाईल तस तसा निर्णय होईल, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

शंभरपैकी एकाही पत्राचं उत्तर नाही

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी त्यांना 100 पत्रं दिले. पण त्यांनी एकाही पत्राला उत्तर दिलं नाही, अशी खंत राजेश वानखेडे यांनी यावेळी बोलून दाखवली.