महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही; संजय राऊतांनी विरोधकांना फटकारले

| Updated on: Apr 26, 2021 | 10:18 AM

कोरोनाच्या संकटात सुरू असलेल्या राजकारणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. (shiv sena leader sanjay raut taunt bjp over corona crisis)

महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही; संजय राऊतांनी विरोधकांना फटकारले
शिवसेना खासदार संजय राऊत
Follow us on

मुंबई: कोरोनाच्या संकटात सुरू असलेल्या राजकारणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. सध्या सगळेच या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला साथ द्या. राजकारण करू नका, असं सांगतानाच संकट ही संधी मानून महाविकास आघाडी राजकारण करत नाही, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे. (shiv sena leader sanjay raut taunt bjp over corona crisis)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. सध्या सगळेच संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रसंगी एकमेकांचे दोष काढणं योग्य नाही. मुंबईसह राज्यात कोरोनावर नियंत्रण येत आहे. त्यामुळे राजकारण करण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्रं येऊन काम करावं. तरच संकटाला तोंड देता येईल. सध्याच्या काळात राजकारण करणं योग्य नाही. राजकारण करण्याची आपली परंपरा नाही आणि सध्याच्या वातावरणात राजकारण करणंही योग्य नाही, असं सांगतानाच महाविकास आघाडी संकट ही संधी मानून कधीच राजकारण करत नाही, असं राऊत म्हणाले.

मोफत लसीकरण हा सरकारचा निर्णय

यावेळी त्यांनी मोफत लसीकरणावरही भाष्य केलं. हा सरकारचा विषय आहे. जनतेच्या हिताचा निर्णय सरकार घेईल. कोणत्याही राजकारणाशिवाय हा निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या संकटातून राज्यालाबाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मजबुतीनं काम करत आहेत. विरोधकांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं. रुग्णांचा जीव वाचवणं हे आपलं प्राधान्य आहे, असंही ते म्हणाले.

ऑक्सिजनशिवाय कुणाचाही बळी नाही

केंद्राने मंजूर करून आणि निधी देऊनही राज्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले नाहीत, या विरोधकांच्या आरोपांचं त्यांनी खंडन केलं. महाराष्ट्रात ऑक्सिजनशिवाय कुणाचाही बळी गेला नाही. उत्तर प्रदेशात, दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. अशाप्रकारचे घाणेरडे आरोप विरोधकांनी करू नये. मी यूपी, बिहार आणि दिल्लीची महाराष्ट्राशी तुलना करत नाही. पण या राज्यांमध्ये जाऊन पाहा, त्या तुलनते महाराष्ट्र निश्चितच चांगलं काम करत आहे, असंही ते म्हणाले.

आघाडी एकत्रित सामना करेल

यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने मारलेल्या छाप्यांवरही त्यांनी भाष्य केलं. अशा प्रकारच्या छापेमारी मागे राजकीय षडयंत्र असेल तर आघाडीतील तिन्ही पक्ष त्याचा एकत्रितपणे सामना करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. (shiv sena leader sanjay raut taunt bjp over corona crisis)

 

संबंधित बातम्या:

मोदी सरकार कोरोना रोखायचा सोडून हेडलाईन मॅनेजमेंट करत बसलंय; निर्मला सीतारामन यांच्या पतीची चपराक

कोरोनाचे मृत्यूतांडव, अंबाजोगाईत एकाचवेळी 28 जणांवर अंत्यसंस्कार

Coronavirus: कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडून 6000 रुपयांची मदत मिळणार

(shiv sena leader sanjay raut taunt bjp over corona crisis)