Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं, संजय राऊतांच्या टार्गेटवर सुर्वे, सरनाईक, गुलाबराव, सत्तार, राऊतांच्या टीकेला धार

शिवसेनेत निर्माण झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी दहीसरमध्ये मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना राऊत यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Sanjay Raut : शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं, संजय राऊतांच्या टार्गेटवर सुर्वे, सरनाईक, गुलाबराव, सत्तार, राऊतांच्या टीकेला धार
संजय राऊत
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 2:16 PM

मुंबई: शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने दहीसरमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली आहे. राऊत यांच्या टीकेतून यावेळी कोणीही वाचू शकलं नाही. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी प्रकाश सुर्वे, गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संदीपान भुमरे या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. बंडखोर आमदार थांबलेले ते गुवाहाटीमधील हॉटेल म्हणजे बिग बॉसचे घर झाले आहे. त्यामुळे यातून अर्धे एलिमिनेट होणारच आहेत. सध्या आसाममध्ये जी ही 40 लोक जाऊन बसली आहेतना ती जिवंत प्रेतं आहेत. तिकडे ते लटपटत आहेत. त्यांचा आत्मा कधीच मेलाय, मी त्यांना चॅलेजं करतो की आता त्यांनी पुन्हा मुंबईत येऊन दाखवावे. शिवसेना म्हटलं की मोदी शहा देखील रस्ता बदलतात अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे.

गुलाबराव पाटलांबद्दल काय म्हणाले संजय राऊत

गुलाबराव पाटील टपरीवर पान विकायचे, त्यांना शिवसेनेने मोठे केले. मंत्री केले. भाषण तर असे झोडतात की मीच एकटा शिवसेनेमध्ये वाघ आहे. मात्र आता वेळी आली तर ढुं ….ला पाय लावून पळून गेले. मात्र मी पण बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. पुन्हा त्यांना टपरीवर पान विकायला लावेपर्यंत शांत बसणार नाही असे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर देखील निशाणा साधला प्रकाश सुर्वे हे पुर्वी भाजी विकायचे शिवसेनेमुळे मोठे झाले. मी तर असं पण ऐकलं आहे की, ते सडकी भाजी विकत होते. त्यांना आपण पुन्हा भाजी विकण्यासाठी बसवू असे राऊत यांनी म्हटले आहे.

संदीपान भुमरेंवर निशाणा

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी संदीपान भुमरेंवर देखील निशाणा साधला. भुमरे हा एक साधा वॉचमन होता. याला वडा सांबर देखील साधं खाता येत नव्हतं. जमिनीवर बसून वडा सांबार खात होता. सामान्य शिवसैनिक आहे म्हणून बाळासाहेबांनी मोरेश्वर सावेंचं तिकीट कापून याला तिकीट दिले. आज कॅबिनेट मंत्री झाला. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर माझी भेट घेतली, उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेनेमुळे मंत्री झालो म्हणून रडायला लागला. मात्र आता कळाले की हे सर्व खोटे अश्रू होते.

हे सुद्धा वाचा

सत्तारांवर टीका

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना आमदार अब्दुल सत्तार आणि सरनाईक यांचा देखील चांगलाच समाचार घेतला. हिंदुत्त्व धोक्यात आहे असे कोण म्हणत आहे तर अब्दुल सत्तार असा उपरोधिक टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच सरनाईक यांना इशारा देताना आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.