विजयबापू हे काय? टीका अजित पवार यांच्यावर पण राज ठाकरे देखील दुखावतील

शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीत डावललं जात असल्याच्या चर्चा सुरु असताना शिवतारे यांनी या चर्चांना आणखी खतपाणी घालणारं वक्तव्य केलं आहे.

विजयबापू हे काय? टीका अजित पवार यांच्यावर पण राज ठाकरे देखील दुखावतील
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 11:54 PM

पुणे : शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि पवार कुटुंबाबद्दल धक्कादायक दावा केला आहे. अजित पवार यांनी आज एका मुलाखतीत आपण मुख्यमंत्री पदाबद्दल आता सुद्धा दावा करु शकतो, असं म्हटलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी अजित पवार हे राष्ट्रवादीच्या 40 आमदारांना घेऊन बंड पुकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. याबद्दलच्या चर्चांनी परिसीमा गाठल्यानंतर अखेर अजित पवार हे प्रसारमाध्यमांसमोर आले होते. त्यांनी आपण आयुष्यभर राष्ट्रवादीसोबत राहणार असल्याचं म्हटलं. पण शिवसेना नेते यांना आता अजित पवार यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख केला आहे.

“अजित पवार यांचा पुढे राज ठाकरे होणार आहे. त्यांना पवार कुटुंबातूनच विरोध आहे. त्यांचा काटा काढला जातोय. राज ठाकरे बरोबर जे महाबळेश्वरमध्ये झालं तेच आज अजित पवारांसोबत होतंय. त्यांना कुटुंबाकडूनच बाहेर ढकलून दिले जात आहे”, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. शिवातारे यांनी केलेला दावा या सध्याच्या राजकीय घडामोडी आणि चर्चांच्या पार्श्वभूमीवर आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असल्याच्या चर्चा वारंवार समोर येत असतात. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात अजित पवार यांना बोलू दिलं गेलं नव्हतं. त्यावेळी अजित पवार हे मंचावरुन निघून गेले होते. पक्षात आपल्याला डावललं जात असल्याची भावना अजित पवार यांची असल्याची चर्चा आहे. त्यातून ते थेट भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी आज विजय शिवातारे यांच्यावरही टीका केल्याची माहिती समोर आलीय. त्यावर शिवतारे यांनी त्यांना आपल्या कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “अजित पवार यांनी माज उतरवण्याची भाषा करू नये. स्वतःच्या मुलाला का निवडून आणू शकले नाहीत?” असा सवाल विजय शिवतारे यांनी केला. बारामतीमधील अनेक गाव आज दुष्काळग्रस्त आहेत, असंही विजय शिवतारे यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचंय?

अजित पवार यांनी याआधी उपमुख्यमंत्री पद भूषवलं आहे. याशिवाय अजित पवार भाजपसोबत गेले तर मुख्यमंत्री होतील, अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता अजित पवार यांनी आज केलेल्या विधानावरुन त्यांचं आगामी काळात मुख्यमंत्री पदाशिवाय समाधान होणार नाही, असंच दिसतंय. त्यांनी ‘सकाळ’च्या कार्यक्रमात दिलेल्या विशेष कार्यक्रमात याबाबत भूमिका मांडली आहे. “राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं आकर्षण नाही. पण मख्यमंत्रीपदाची दावा ठेवण्याची आताही तयारी आहे”, असं मोठं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.

यावेळी अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडणार नसल्याचं स्पष्ट केलं. “पहाटेचा शपथविधी नाही. सकाळी आठला पहाट म्हणत नाही. पहाट म्हणजे चार पाच, सहा वाजेची वेळ. या गोष्टीला जवळपास साडेतीन वर्ष झाली आहे. मी वारंवार बोलतोय की, या विषयावर मला भाष्य करायचं नाही”, असं अजित पवार म्हणाले.

“मला उपमुख्यमंत्री पद का मिळालं? तर मला राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार निवडून आले होते त्यापैकी बहुसंख्य आमदारांनी अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद द्यावं, असं पक्षाला सांगितलं. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठांनी मला ते पद दिलं”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.