Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sena: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचे 20 बंडखोर आमदार शिवसेनेच्या संपर्कात, भाजपात विलिन व्हायला विरोध, शिवसेना नेत्यांचा दावा

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्यास नकार देणाऱ्या बंडखोर आमदारांशी शिवसेना नेत्यांचा संपर्क झाला आहे, असा दावा काही नेत्यांनी केलाय. असे एकूण 20 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Shiv Sena: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचे 20 बंडखोर आमदार शिवसेनेच्या संपर्कात, भाजपात विलिन व्हायला विरोध, शिवसेना नेत्यांचा दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 1:43 PM

मुंबईः एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून अधिकच ताणलं गेल्यामुळे महाराष्ट्रातील सत्तानाट्य प्रदीर्घ होत असल्याची चिन्ह आहेत. आमच्याकडे 40 पेक्षा जास्त शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणत आहेत तर शिवसेनेच्या गोटातूनही मोठी बातमी पुढे आली आहे. बंडखोर आमदादरांपैकी तब्बल 20 आमदार (ShivSena MLA) शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातून सूरत आणि तेथून गुवाहटीत गेलेल्या आमदारांना भाजपचं पाठबळ असल्याचं सातत्यानं बोललं जात आहे. मात्र बंडखोरांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे वरिष्ठ नेतेही या आमदारांशी वारंवार संपर्क साधत आहेत. दिवसेंदिवस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांमधील बोलण्याचा आत्मविश्वास वाढताना दिसतोय. त्यामुळे बंडखोरांची ताकद खरच कमी होतेय का, अशीही शंका उपस्थित होतेय.

भाजपात विलीन होण्यास नकार

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्यास नकार देणाऱ्या बंडखोर आमदारांशी शिवसेना नेत्यांचा संपर्क झाला आहे, असा दावा काही नेत्यांनी केलाय. असे एकूण 20 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांच्यावर भाजपमध्ये शामिल होण्यासाठी दबाव टाकला जातोय. मात्र शिवसेनेशिवाय दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास त्यांनी नकार दिल्याचं कळतंय. त्यामुळे गुवाहटीतले नेते महाराष्ट्रात आले की खऱ्या अर्थाने शिवसेनेची ताकद काय आहे हे उभ्या महाराष्ट्राला कळेल, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.

संजय राऊतांनी सगळ्यांचीच खेचली

दरम्यान, दहिसर येथे आज शिवसेनेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यात संजय राऊत यांनी सर्वच बंडखोर आमदारांवर सडेतोड टिका केली. शिवसेनेचा बाप एकच असून तिकडे गेलेल्यांचे अनेक बाप आहेत. काही सूरतमध्ये, काही गुवाहटीत, काही दिल्लीत तर काही मुंबईत आहेत. त्यामुळे अशा लोकांना समाजात मान्यता नसते, अशा शब्दात संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर टीकास्त्र सोडलं.

भाजपाच्या गोटात बैठकांवर बैठका

कालच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात गुजरातमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर आली. तर आज मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरही भाजपची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार आदींची उपस्थिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्यावर सत्ता स्थापनेसाठी भाजप कशा प्रकारे ठोकू शकतं, सत्तेसाठी आणखी काय मोर्चेबांधणी करावी लागेल, यासंबंधी या बैठकांत चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येतंय.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.