Ambadas Danve | विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेते पद शिवसेनेकडं? औरंगाबादच्या अंबादास दानवेंना विरोधी पक्ष नेतेपदाची लॉटरी?

विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेते पद अंबादास दानवे यांच्याकडे जाईल की नाही, यावरही प्रश्नचिन्ह आहे. कारण विधान परिषदेतील काही आमदारही एकनाथ शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षीय संख्याबळ काय आहे तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काय भूमिका आहे, यावर हा निर्णय घेतला जाईल.

Ambadas Danve | विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेते पद शिवसेनेकडं? औरंगाबादच्या अंबादास दानवेंना विरोधी पक्ष नेतेपदाची लॉटरी?
अंबादास दानवे, आमदारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 5:30 PM

मुंबईः महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार उद्या होणार असून याच धर्तीवर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विधान परिषदेतचं विरोधी पक्ष नेते पद शिवसेनेकडे (Shivsena) जाण्याची शक्यता आहे. औरंगाबादचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना हे पद मिळण्याचं अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. शिवसेनेच्या वतीने विधान परिषद सचिवांना यासंबंधीचे पत्र देण्यात आले आहे. मात्र विधान परिषदेतील शिवसेना आमदारांचे संख्याबळ तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्ष विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत किती आमदार राहतील आणि शिंदे गटात किती आमदार जातील, यावर हे पद शिवसेनेकडे राहिल की नाही, हे ठरेल. विरोधी पक्ष नेते पद शिवसेनेकडे राहिल्यानंतर मविआतील अन्य पक्षांनी सहमती दर्शवल्यास अंबादास दानवे यांच्या गळात विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेचा दावा

या पदासाठी विधिमंडळ सचिव यांना शिवसेनेच्या वतीने पत्र देण्यात आलं आहे. या पदावर शिवसेनेच्या वतीनं अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी, असं हे पत्र आहे. मात्र महाविकास आघाडीत या पदावरून आणखी काय निर्णय घेतला जाऊ शकतो, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपापल्या परीने यावर दावा करू शकतं. महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर विधान सभेचं विरोधी पक्ष नेते पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलंय. अजित पवार हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीचीही इच्छा…

महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी तिन्ही पक्ष आग्रही होते. त्यापैकी शिवसेनेने या आधीच विधान परिषदेच्या सचिवांकडे या पदासाठी दावा करणारं पत्र दिलं होतं. आता त्यांनी अंबादास दानवे यांच्या नावासहित निवेदन दिलं आहे. या पदावर दानवे यांची नियुक्ती केली जावी, अशी विनंती यात करण्यात आली असून पत्राच्या खाली पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी आहे.

संख्याबळाचा प्रश्न येणार?

विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेते पद अंबादास दानवे यांच्याकडे जाईल की नाही, यावरही प्रश्नचिन्ह आहे. कारण विधान परिषदेतील काही आमदारही एकनाथ शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षीय संख्याबळ काय आहे तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काय भूमिका आहे, यावर हा निर्णय घेतला जाईल.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.