‘मुंबई’ऐवजी ‘बॉम्बे’, शिवसेनेच्या मंत्र्यांचा ‘उद्योग’

मुंबई : ‘बॉम्बे’चं नामकरण ‘मुंबई’ होऊन दोन दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतरही शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘बॉम्बे’च म्हटल्याचे समोर आलंय. राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी त्यांच्या खात्याच्या डायरीमध्ये ‘मुंबई’चं नाव ‘बॉम्बे’ असं केलंय. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ही बाब समोर आणली आणि मंत्री सुभाष देसाई यांच्यावर टीकाही केली. सुभाष देसाईंच्या […]

'मुंबई'ऐवजी 'बॉम्बे', शिवसेनेच्या मंत्र्यांचा 'उद्योग'
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई : ‘बॉम्बे’चं नामकरण ‘मुंबई’ होऊन दोन दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतरही शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘बॉम्बे’च म्हटल्याचे समोर आलंय. राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी त्यांच्या खात्याच्या डायरीमध्ये ‘मुंबई’चं नाव ‘बॉम्बे’ असं केलंय. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ही बाब समोर आणली आणि मंत्री सुभाष देसाई यांच्यावर टीकाही केली.

सुभाष देसाईंच्या खात्याचा नेमका प्रताप काय?

शिवसेनेचे नेते सुभाष देसाई हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहे. उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण म्हणजेच एमआयडीसीने डायरी छापली आहे. या डायरीत महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रांची माहिती देणारा एक नकाशाही छापण्यात आला आहे. या नकाशात ‘मुंबई’ शहराचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा करण्यात आला आहे.

धनंजय मुंडेंनी काय म्हटलं आहे?

“बॉम्बेचे नाव अधिकृत मुंबई झालेले शिवसेनेला माहीत नाही का? की शिवसेनेचा मराठीचा कळवळा फक्त दाखवण्यापुरताच आहे. कारण सेनेच्या ताब्यात असलेल्या उद्योग खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या MIDC च्या डायरीतच मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ करण्यात आला आहे.”, असे राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

शिवसेना आणि मुंबई

मुंबई आणि शिवसेना हे नातं सर्वश्रुत आहे. मुंबई म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मुंबईतल्या प्रशासनावर म्हणजेच मुंबई महापालिकेवरही गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. एवढंच नव्हे, तर ‘बॉम्बे’चं नामकरणही शिवसेनेच्या सत्ताकाळातच झालं. म्हणजे 1995 साली ‘बॉम्बे’चं ‘मुंबई’ करण्यात आलं

राजकारणासाठी कायम मुंबईचा वापर करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना प्रत्यक्षात ‘मुंबई’ शब्दाचं वावडं का, असा प्रश्नही आता विचारला जातो आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.