युतीचा पहिला झटका चंद्रपुरातून, शिवसेना आमदाराचा काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित!

चंद्रपूर : वर्ष-दोन वर्षांपासून स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेने अखेर भाजपशी सलगी करत युतीची घोषणा केली खरी, मात्र आता या युतीचे साईड इफेक्ट्स जाणवायला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांची नाराजी उघड झाली आहे. चंद्रपूर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या आमदार धानोरकरांनी मुंबई ‘मातोश्री’वर येऊनही आपली नाराजी व्यक्त केली. मात्र, […]

युतीचा पहिला झटका चंद्रपुरातून, शिवसेना आमदाराचा काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:21 PM

चंद्रपूर : वर्ष-दोन वर्षांपासून स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेने अखेर भाजपशी सलगी करत युतीची घोषणा केली खरी, मात्र आता या युतीचे साईड इफेक्ट्स जाणवायला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांची नाराजी उघड झाली आहे. चंद्रपूर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या आमदार धानोरकरांनी मुंबई ‘मातोश्री’वर येऊनही आपली नाराजी व्यक्त केली. मात्र, दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढूनही आमदार धानोरकर नाराज आहेत. त्यामुळे ‘खोतकर-दानवे’ वाद शमण्याची चिन्ह असताना, आता शिवसेनेसमोर नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.

वरोरा विधानसभा मतदार संघातील शिवसेना आमदार बाळू धानोरकर हे भाजपशी पुन्हा युती झाल्याने नाराज आहेत. शिवाय, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर विद्यमाना खासदार आहेत. त्यामुळे अर्थात युती झाल्याने बाळू धानोरकर यांना शिवसेनेकडून चंद्रपुरातून लोकसभा लढवता येणार नाही.

त्यात, शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी गेल्या काही दिवसात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे धानोरकर शिवसेनेची साथ सोडून काँग्रेसचा ‘हात’ पकडणार पकडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. धानोरकरांनी तर चंद्रपुरातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी तयारीही केली आहे.

काही दिवसांपूर्वीच आमदार बाळू धानोरकर यांनी मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि आपल्या भावना मांडल्या होत्या. भाजपने उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांचा वारंवार केलेला अपमान लक्षात घेऊन पुन्हा झालेली युती मान्य नाही, असे बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे. युती का केली, हे उद्धव ठाकरेंनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, धानोरकरांनी काही ऐकले नाही. ते नाराज होऊनच ‘मातोश्री’वरुन बाहेर पडले आणि चंद्रपुरात निघून गेले.

चंद्रपूरमध्ये भाजपशी किमान मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी मागणी यावेळी धानोरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. तसे न झाल्यास पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेणार, असा इशारा धानोरकरांनी थेट उद्धव ठाकरेंना दिला.

गेल्या काही वर्षात सत्तेत एकत्र असतानाही शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु आहे. या काळात आमदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपुरात लोकसभेच्या दृष्टीने शिवसेनेची बांधणी केली होती, तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी कच खात उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती केल्याने धानोरकर प्रचंड नाराज झाले.

कोण आहेत बाळू धानोरकर?

बाळू धानोरकर हे शिवसेनेचे चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. सुरेश नारायण धानोरकर असे त्यांचे पूर्ण नाव असून, बाळूभाऊ धानोरकर या नावाने ते मतदारसंघात आणि चंद्रपूर जिल्ह्यात परिचित आहेत. 2009 सालीही बाळू धानोरकर वरोऱ्यातून आमदारकीला उभे होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या संजय देवतळेंनी त्यांचा परभाव केला होता. मात्र, 2014 च्या निवडणुकीत बाळू धानोरकर विजयी होत विधानसभेत गेले.

संबंधित बातम्या :

युतीचे साईड इफेक्ट्स! शिवसेना आमदार काँग्रेसच्या वाटेवर?

एकीकडे खोतकर-सत्तार गुफ्तगू, दुसरीकडे दानवे-टोपे गळाभेट

खोतकरांच्या नाराजीचा भाजपला धसका, दानवेंसह सहकारमंत्री भेटीला

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.