Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार अपात्रतेच्या सुनावणीत सुरत-गुवाहाटीच्या प्रश्नावरुन खडाजंगी, शिंदे गटाच्या आमदाराचं उत्तर देण्यास नकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार सुरत आणि तिथून गुवाहाटीला गेले होते. आमदारांच्या सुरत आणि गुवाहाटीच्या प्रवासाबाबत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांना फेरसाक्ष नोंदवत असताना प्रश्न विचारले. पण दिलीप लांडे यांनी कामत यांच्या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला.

आमदार अपात्रतेच्या सुनावणीत सुरत-गुवाहाटीच्या प्रश्नावरुन खडाजंगी, शिंदे गटाच्या आमदाराचं उत्तर देण्यास नकार
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 3:36 PM

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, नागपूर | 8 नोव्हेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज दोन सत्रात सुनावणी पार पडत आहे. पहिल्या सत्रातील सकाळची सुनावणी पूर्ण झाली. पहिल्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची फेरसाक्ष नोंदवण्यात आली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाच्या वकिलांची फेरसाक्ष नोंदवली. या सुनावणीला दिलीप लांडे यांच्यामुळे उशिरा सुरुवात झाली. सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, दोन्ही बाजूचे वकील उपस्थित होते. पण साक्षीदाराला उशिर झाल्याने सुनावणीला विलंब झाला. विशेष म्हणजे या सुनावणीत गुवाहाटीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. दिलीप लांडे यांनी सुरत-गुवाहाटीच्या प्रवासावर माहिती देण्यास नकार दिला.

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी दिलीप लांडे यांना गुवाहाटीला गेला होता का? हॉटेलचे भाडे भाजपने भरले का? असे काही प्रश्न विचारले. पण या प्रश्नांना दिलीप लांडे यांनी बगल दिली. त्यांनी खाजगी माहिती असल्याचे सांगत बचाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वकील देवदत्त कामत यांनी लांडे यांना सुनील प्रभू यांनी बजावलेल्या व्हीप विषयीदेखील प्रश्न विचारले.

नेमके सवाल-जवाब काय?

देवदत्त कामत – राजन प्रभाकर साळवी यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव होता. ३ जुलै २०२२ रोजी त्यांना शिवसेनेकडे उमेदवार म्हणून उभे केले होते, हे चूक की बरोबर?

दिलीप लांडे – शिवसेनेतर्फे राहुल नार्वेकर यांना उभे केले होते.

देवदत्त कामत – राजन साळवी हे शिवसेनेचे अध्यक्ष पदाचे उमेदवार असल्यामुळे आपण या प्रश्नाचे उत्तर मुद्दाम देत नाही?

दिलीप लांडे – अध्यक्ष महोदय, मी नवीन असल्यामुळे सर्व सदस्यांना ओळखत नाही.

देवदत्त कामत – तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला सर्व शिवसेना आमदारांची नावे माहिती नव्हती, असे म्हणणे बरोबर आहे की चूक?

दिलीप लांडे – बरोबर

देवदत्त कामत – दिलीप लांडे यांनी कोणाला मतदान केले?

दिलीप लांडे – मतदान हे गोपनीय असते

विधानसभा अध्यक्ष – हे मतदान रेकॉर्डवर असल्याने सांगण्यास हरकत नाही

देवदत्त कामत शिंदे गटाच्या वकिलांवर संतापले. लांडे यांनी प्रतिज्ञापत्रात राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे उलट साक्ष घेताना कुठल्याही प्रकारे आक्षेप घेण्याचे कारण नव्हते. हा शुद्ध वेळकाढूपणा असल्याचा आरोप कामत यांनी शिंदे गटावर केला आहे.

देवदत्त कामत – अपात्रता याचिकेत आपण म्हटले आहे की, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांच्या बाजूने तुम्ही मतदान केले. हे मतदान तुम्ही शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या व्हिपनुसार मतदान केले? हा व्हिप लेखी आदेशानुसार नुसार काढला होता का?

दिलीप लांडे – आठवत नाही

देवदत्त कामत – राजन साळवी यांच्या विरोधात आणि राहुल नार्वेकर यांना मतदान करावे, असा कुठलाही व्हिप शिवसेनेने काढला नव्हता.

(शिंदे गटाच्या वकिलांचा आक्षेप. हे त्यांचे मत झाले. त्यात खरे किंवा खोटे? असा कुठलाही प्रश्न नाही.)

देवदत्त कामत – राजन साळवी यांच्या विरोधात आणि राहुल नार्वेकर यांना मतदान करावे, असा कुठलाही व्हिप शिवसेनेने काढला नव्हता. हे बरोबर की चूक?

दिलीप लांडे – मी पूर्वीच सांगितले, मला आठवत नाही.

कामत – याचा अर्थ तुम्ही नवीन असल्याने शिवसेना पक्षाच्या सर्वच सदस्यांची नावे माहीत नव्हती? हे म्हणणं बरोबर ठरेल का ?

लांडे – बरोबर

कामत – म्हणजे 3 जुलै 2022 रोजी तुम्ही भाजपच्या राहूल नार्वेकर यांना अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदान केले होते का ?

(या प्रश्नावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. मतदान करणे हा विशेषधिकार आहे)

कामत- आपत्रता याचिका क्रमांक 19 मध्ये उत्तर देताना तुम्ही म्हणाला आहेत की तुम्ही राहुल नार्वेकर यांना 164 मतांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून आणलं. याचा अर्थ तुमच्या गटाकडून जो व्हीप जारी केला त्यानुसार तुम्ही राहुल नार्वेकर यांना मतदान केलं?

कामत – राहुल नार्वेकर यांना मतदान करावे असा लिखित स्वरूपात व्हीप आहे का ?

लांडे – आठवत नाही

कामत – राहुल नार्वेकर यांना मतदान करावे आणि राजन साळवी विरोधात मतदान करावे असा कुठलाही व्हीप शिवसेना पक्षाने काढला नव्हता? हे बरोबर आहे का

लांडे – मी आधीच सांगितले, आठवत नाही

देवदत्त कामत – आपण rajgadbank9@gmail.com हा मेल आयडी ओळखता का?

दिलीप लांडे – होय, माझा आहे. परंतू माझ्या पतपेढीचा आहे.

देवदत्त कामत – २ जुलै २०२२ रोजी दुपारी २.४२ वाजता सुनील प्रभू यांनी जारी केलेले दोन व्हीप ईमेलद्वारे मिळाले, हे बरोबर आहे का?

दिलीप लांडे- मी मुंबईमध्ये नव्हतो. त्यामुळे मला माहिती नाही.

देवदत्त कामत – आपण ३ जुलै २०२२ रोजी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पाठवलेल्या व्हीपचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आपण अपात्रता कारवाईसाठी पात्र आहात. हे चूक की बरोबर?

दिलीप लांडे – मला सुनील प्रभू यांनी कुठलाही व्हीप पाठवला नाही.

देवदत्त कामत – तुम्हाला ४ जुलै २०२२ रोजीचा भरत गोगावले यांनी जारी केलेला कथित व्हीप कसा मिळाला?

दिलीप लांडे – माझ्या हातात दिला.

देवदत्त कामत – हा कथित व्हीप आपल्या हातात केव्हा ठेवला गेला?

दिलीप लांडे – वेळ आठवत नाही

देवदत्त कामत – आपण ३ जुलै २०२२ रोजी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पाठवलेल्या व्हीपचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आपण अपात्रता कारवाईसाठी पात्र आहात. हे चूक की बरोबर?

दिलीप लांडे- मला सुनील प्रभू यांनी कुठलाही व्हीप पाठवला नाही.

कामत – 4 जुलै 2022 रोजीचा भरत गोगावले यांनी जारी केलेला कथित पक्षादेश कसा मिळाला ?

लांडे- माझ्या हातात दिला

कामत- कथित पक्षादेश आपल्या हातात केव्हा ठेवण्यात आला ?

लांडे – मला वेळ आठवत नाही. मला तारीख आठवते, 4 जुलै

कामत – कथित व्हीप तुम्हाला तुमच्या हातात दिल्यानंतर तुम्ही त्याची पोचपावती दिली का ?

लांडे- आठवत नाही

कामत – 4 जुलै 2022 विश्वास दर्शक प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वी भरत गोगावले यांनी कुठलाही व्हीप कुठल्याही सदस्याला दिला नव्हता हे खरं आहे का ?

लांडे- मला दिला आहे हे मी कबूल केलं आहे

कामत – तुम्हाला हा कथित व्हीप तुम्हाला कथितरित्या दिला, तेव्हा तुम्ही त्याची काही पोचपावती दिली का?

दिलीप लांडे – आठवत नाही.

कामत – ४ जुलैला भरत गोगावले यांनी कुठलाही व्हीप जारी केला नव्हता, हे चूक की बरोबर?

लांडे – मला दिला हे मी कबूल केलंय

कामत – तुम्ही एकनाथ शिंदे यांना मतदान केलं का?

(या प्रश्नावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. त्यामुळे दिलीप लांडे यांना काही काळासाठी बाहेर जायला सांगितलं)

कामत – तुम्ही एकनाथ शिंदे यांना मतदान केलं का?

दिलीप लांडे – बरोबर

कामत – २०-२१ जून रोजी‌ तुम्ही एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होता का?

लांडे – मी गेल्या २५ वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे

कामत – म्हणजे तुम्ही २०-२१ जूनलाही संपर्कात होते हे खरे आहे का?

लांडे – मी २० तारखेला त्यांना भेटलो ‌होतो

लांडे – २०ला मतदान होते, त्यावेळी मी त्यांना भेटलो. पण २१ तारखेला भेटलो नव्हतो.

देवदत्त कामत – २० जून २०२२ ते २४ जून २०२२ पर्यंत एकनाथ शिंदे यांच्याशी आपला कोणताही संपर्क नव्हता, असे म्हणणे योग्य राहिल का?

लांडे – बरोबर आहे.

कामत – तुम्ही २० ते ३० जून मुंबईत होतात का?

लांडे – आठवत नाही. २० ला होतो मुंबईत. २०,२१,२२ मी मुंबईमध्ये होतो.

कामत – 4 जुलै 2022 रोजीच्या विश्वासदर्शक ठरावात आपण एकनाथ शिंदे यांना मतदान केले जे भाजप पक्षाच्या पाठिंब्याने सरकार बनवत होते? हे बरोबर आहे का ?

लांडे – हे बरोबर आहे

कामत – 2 जुलै 2022 रोजी सुनील प्रभू यांनी पक्षाकडून जो पक्षादेश दिला होता त्याचे तुम्ही उल्लंघन करून तुम्ही अपात्रता ओढवून घेतली आहे ?

लांडे- मला सुनील प्रभू यांनी कुठलाही व्हीप पाठवला नाही, व्हीप मिळालं नाही

कामत – 20 जून आणि 21 जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होतात का ?

लांडे – मी गेली 25 वर्षे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे

कामत – म्हणजे तुम्ही 20 आणि 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होतात ?

लांडे – मी 20 जून या तारखेला त्यांना भेटलो होतो. मी 20 तारखेला मतदान होत म्हणून तिथे त्यांना भेटलो 21 जूनला भेटलो नाही

कामत – 20 जून 2022 नंतर तुम्ही 24 जून 2022 पर्यत एकनाथ शिंदे यांच्या सोबत तुमचा कुठलाही संपर्क नव्हता ? हे बरोबर आहे का ?

लांडे – बरोबर आहे

कामत – 20 ते 30 जून 2022 दरम्यान तुम्ही मुंबईत होतात का ?

लांडे – आठवत नाही. 20, 21 आणि 22 तारखेला मुंबईत होतो

कामत- 22 जून ते 30 जून 2022 दरम्यान तुम्ही महाराष्ट्रबाहेर प्रवास केला आहे का ?

लांडे- हो

कामत – 22 जून ते 20 जून 2022 दरम्यान तुम्ही महाराष्ट्र बाहेर कुठे गेला होता? हे सांगू शकाल का ?

लांडे- ही माझी खाजगी माहिती आहे, ती मी सांगू शकत नाही…मी कुठेही फिरू शकतो

कामत – 22 जून ते 30 जून 2022 दरम्यान तुम्ही सुरत आणि गुवाहाटीला गेला होतात का ?

लांडे- मी आधीच सांगितलं की ही माझी खाजगी माहिती आहे. मी कुठे फिरायचं हा माझा अधिकार आहे

कामत – 21 जून आणि 22 जून 2022 रोजी तुम्ही वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्याना मुलाखती दिल्या का? ज्यामध्ये तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत आणि एकनाथ शिंदे यांना आपण पाठींबा देत नाहीत असं मुलाखतीत बोलले होते का ?

लांडे – आठवत नाही

कामत – सुरत आणि गुवाहाटी मध्ये किंवा महाराष्ट्राबाहेर ज्या हॉटेलमध्ये तुम्ही राहत होतात याचे भाडे भाजप पक्षाने दिले का? हे खरे आहे का ?

लांडे- मी स्वतः गेलो होतो, मी कुठे राहिलो, कुठे गेलो याची माहिती मी कोणाला देऊ शकत नाही

कामत – 22 ते 30 जून दरम्यान महाराष्ट्र बाहेरील प्रवास खाजगी चार्टड प्लेनने केला गेला होता का ?

लांडे – ही माझी खाजगी जीवनाची माहिती आहे. मी रिक्षा चालवत गेलो का किंवा मी बैलगाडीत गेलो हे मी सांगू शकत नाही

कामत – 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत जी सही तुम्हाला दाखवतो ती तुम्हीच केली आहे का ?

लांडे- बरोबर आहे. तुम्ही जे कागदपत्र दाखवताय या कागदपत्रावर हाताने वरच्या बाजूस काहीतरी लिहीले आहे. माझी सही झाल्यानंतर पक्षादेश क्रमांक 2/2022 असे लिहिलेले आहे. असे मला वाटतं

कामत – 21 जून 2022 ला व्हीप जारी झाला जो सुनील प्रभू यांच्याकडून मिळाला होता, म्हणून तुम्ही त्या बैठकीला उपस्थित होता ? हे खरे आहे का ?

लांडे- मला गुलाबराव पाटील नावाच्या व्यक्तीने फोन केला होता म्हणून मी त्या बैठकीला उपस्थित होतो

कामत – 21 जून 2022 रोजी वर्षा निवासस्थानी जी बैठक बोलावली त्याबाबत जो व्हीप मिळाला याची पोचपावती दिली होती का ?

लांडे- मी आधीच सांगितले की 21 तारखेच्या बैठकीसाठी गुलाबराव पाटील यांचा फोन आला होता

(शिवसेना विधिमंडळ कार्यालयाच्या लेटरहेडवरील 21 जून 2022 च्या कागदपत्रावर साक्षीदाराला या संदर्भातील साक्षीदाराची सही दाखवली गेली)

कामत – २१ जून २०२२ रोजी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित आमदारांच्या पाठिब्यांवरून एकनाथ शिंदे यांना शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या गटनेते पदावरून हटवले होते. हे खरे आहे का?

लांडे – आठवत नाही

कामत – २१ जून २०२१ रोजी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित आमदारांच्या पाठिब्यांने अजय चौधरी यांची एकनाथ शिंदे यांच्या जागी शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली. हे चूक की बरोबर?

लांडे – आठवत नाही.

कामत – २१ जून २०२२ रोजीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक हे एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटतील, याची कल्पना उपस्थित आमदारांना दिली नव्हती. हे चूक की बरोबर?

लांडे – दिली होती

कामत – एकनाथ शिंदे यांनी २० जून ते ३० जून २०२२ दरम्यान भाजपची साथ देण्यासाठी एखादी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक बोलावली होती का?

लांडे – होय.

कामत – २० ते ३० जून २०२२ दरम्यान राष्ट्रीय कार्यकारिणी ही बैठक कधी आणि कुठे बोलावण्यात आली होती?

लांडे – आठवत नाही

कामत – एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांना बैठक बोलावण्यासाठी एखादी नोटीस बजावली होती का?

लांडे – माहिती नाही.

कामत – या कागदपत्रवर जी सही केली गेली आहे ते तुमचीच आहे का ?

लांडे – हो

कामत – 21 जून 2022 च्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्व उपस्थित आमदारांच्या पाठिंब्याने बैठकीत एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदावरून हटवले, हे खरे आहे का ?

लांडे – आठवत नाही

कामत – याच बैठकीत उपस्थित आमदारांच्या पाठिंब्याने अजय चौधरी यांनी उद्धव ठाकरे यांनी नेमणूक केली. हे बरोबर आहे का ?

लांडे- आठवत नाही

कामत – 21 जून 2022 रोजी वर्षावर सुरू असलेल्या बैठकीत उपस्थित आमदारांना मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते याची कल्पना दिली नव्हती?

लांडे- दिली होती

कामत – 20 जून ते 30 जून 2022 दरम्यान एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवली होती का? ज्यामध्ये भाजपला साथ द्यायचे ठरले ?

लांडे – हो बैठक झाली

कामत – राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक कुठे आणि केव्हा झाली

लांडे – आठवत नाही

कामत – राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्यांना या बैठकीबाबत नोटीस पाठवली होती का ?

लांडे – माहीत नाही

कामत – 20 जून ते 30 जून 2022 दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून कुठलीही राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली नव्हती? हे चूक की बरोबर?

लांडे – लक्षात येत नाही

कामत – याच दरम्यान प्रतिनिधी सभा किंवा याबाबत बैठक एकनाथ शिंदे यांनी बोलवली होती का ?

लांडे- आठवणीत येत नाही

कामत – तुम्ही २२ जून २०२२ रोजी वर्षा बंगला येथे शिवसेना विधीमंडळ पक्षाची एखादी बैठकीला उपस्थित होता का?

लांडे – होय

कामत – अजय चौधरी हे त्या बैठकीचे अध्यक्षस्थानी होते, हे खरे आहे का?

लांडे – असे नव्हते. पक्षाचे सर्वच पदाधिकारी होते. पक्षाच्या नेतेमंडळींची ती बैठक होती.

(वर्षा बंगला येथे २२ जून २०२२ रोजी झालेल्या बैठकीचे हजेरीपत्रक लांडे यांना दाखवण्यात आले आहे.)

कामत – वर्षा बंगला येथे २२ जून २०२२ रोजी झालेल्या बैठकीतील या हजेरी पत्रकावर तुम्ही सही केली आहे का?

लांडे – होय, परंतू विधीमंडळ सदस्यांच्या यादीवर या सह्या घेतल्या होत्या. आमची यादी बनविली आणि सह्या घेतल्या. पण दिनांक २२ जून २०२२ रोजीची बैठकीची उपस्थिती नंतर पेशाने लिहिलेले आहे. ते टाईप केलेले नाही. मला यातून आपल्या निदर्शनास आणून द्यायचे आहे की विधानसभा सदस्यांच्या यादीवर अगोदर सह्या घेतलेल्या असतात.

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.