लोकांना सांगितले त्याला मारा, त्याचा मर्डर अटळ…शिंदे गटाच्या आमदाराची अधिकाऱ्यास धमकी

shiv sena eknath shinde | आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संतोष बांगर यांच्या मारहाणीचे दमदाटीचे प्रकार समोर येऊन काही महिने झाले आहेत. आता पुन्हा आमदार महेंद्र दळवी यांनी अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे.

लोकांना सांगितले त्याला मारा, त्याचा मर्डर अटळ...शिंदे गटाच्या आमदाराची अधिकाऱ्यास धमकी
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 2:04 PM

आनंद पाडे, मुंबई, दि.24 डिसेंबर | राज्यात शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी असे महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. सरकारमधील काही लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांना धमक्या देण्याचे प्रकार वारंवार उघड होत आहे. आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संतोष बांगर यांच्या मारहाणीचे दमदाटीचे प्रकार समोर आले होते. आता अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. वीज बिल वसूल प्रकरणावरुन ही धमकी दिला आहे. टीव्ही ९ मराठी या ऑडिओची पुष्टी करत नाही.

काय आहे प्रकार

आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड येथील सहायक अभियंता राठोड यांना फोन लावला. लोकांना सध्या व्यवसाय करु द्या. सध्या वीज बिल वसुली करु नका. पाच जानेवारीपर्यंत वसुली थांबवा, असे आमदार दळवी यांनी सांगितले. राठोड यांनी ते माझ्या हातात नाही, वरिष्ठांच्या हातात असल्याचे सांगितले. त्यानंतर आमदार दळवी यांनी मुलानी साहेबांना फोन लावला. त्यांना म्हटले की, तुमचा राठोड अधिकारी आहे. आता मी माझ्या लोकांना आदेश दिला आहे, त्याला मारा. त्याला बदला किंवा मी त्याला मारेल. तो XX आहे…XX. उद्या माझी लोक त्याला ठोकणार आहे. त्याचा मर्डर अटळ आहे. त्याला आमदाराशी कसे बोलावे माहीत नाही. त्याची भाषा चांगली नाही.

बदली माझ्या हातात नाही…

आमदार महेंद्र दळवी आणि मुलानी यांच्या या कॉन्फरन्स कॉलमध्ये दळवीसुद्धा होते. त्यांनी तुमचे आणि माझे बोलणे कधी झाले, असे आमदार दळवी यांना विचारले. त्यावर दळवी यांनी तुम्ही बदली करुन घ्या, असे स्पष्टपणे सांगितले. ते माझ्या हातात नाही. माझी बदली झाली तर माझ्यासाठी चांगले आहे. परंतु बदली माझ्या हातात नाही, असे दळवी यांनी सांगितले. त्यावर आमदार दळवी यांनी मुलानी यांना म्हटले की, उद्याच्या दिवस तुम्ही काही बोलू नका. पोरांना त्याला मारायला लावतो. मग बदली होईल.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे गटातील आमदाराचे धमक्यांचे प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहे. यापूर्वी झालेल्या प्रकरणात संबंधित लोकप्रतिनिधींना समज देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा नवीन प्रकार समोर आला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.