Video : ‘घर की मुर्गी दाल बराबर’, शिवसेना आमदाराची नाराजी जाहीर व्यासपीठावर उघड

महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला साध विचारलं देखील जात नाही. ते म्हणतात ना घर की मुर्गी दाल बराबर असं म्हणत सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Video : 'घर की मुर्गी दाल बराबर', शिवसेना आमदाराची नाराजी जाहीर व्यासपीठावर उघड
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 5:52 PM

सोलापूर : महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अनेक नेत्यांची मंत्रिपदाची संधी हुकली आहे आणि ती खदखद आता उघडपणे बाहेर येत आहे. सांगोला तालुक्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनीही ही नाराजी व्यासपीठावर उघड केली आहे, घर की मुर्गी दाल बराबर असं म्हणत, शहाजी पाटलांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी माढा मतदार संघातील इतर नेत्यांचेही नुकसान झाल्याचे बोलून दाखवले आहे. गेल्या अनेक वर्षापासून शहाजी पाटील दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्याविरूद्ध सांगोल्यातून निवडणूक लढवत होते, मात्र त्यांना यश मिळत नव्हते, यावेळी निवडणुकीआधीच गणपतराव देशमुख यांनी निवडणुकीत निवृत्ती जाहीर केल्याने त्यांचे नातू अनिकेत देशमुख यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली, मात्र यावेळी शहाजी पाटलांनी थोडक्या मतांनी का होईना विजय खेचून आणला, इतकी वर्षे संघर्ष करून आमदार झालेल्या पाटलांना शिवसेनेत गेल्यावर तर मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र ती यावेळीही अधुरीच राहिली.

आम्हाला कुणी विचारतही नाही

माढा लोकसभा मतदारसंघातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला साध विचारलं देखील जात नाही. ते म्हणतात ना घर की मुर्गी दाल बराबर असं म्हणत सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांची खदखद पुन्हा बाहेर आली आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अनेक इच्छुकांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे.

आम्हाला आधीच लांब राहा सांगितलं

पंढरपूर येथील एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार शहाजी पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी पाटील म्हणाले की, मी पहिल्यांदाच शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून आलो. त्यामुळे मला पहिल्यांदाच लांब राहायला सांगितलं होतं. त्यामुळे मला वाटत नाही या सरकामध्ये आमचं कोणी एकेल. आमचा कोण विचार करेलं असही आता वाटत नाही. असं म्हणत आपल्या सरकारला त्यांनी घरचा आहेर दिला आहे. यापूर्वीही आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आमदार पाटील यांचे भाजप नेत्यांशी इतर नेत्यापेक्षा चांगले सख्य आहे असेही म्हटले जाते.

Video : सिंधुदुर्गात पोलीस अधीक्षकांनी हाकला शर्यतीचा बैलगाडा, कोकणातल्या पहिल्या शर्यतीत धुरळा

Nigeria : क्रूरतेचा कळस! अंदाधुंद गोळीबारात 200 ठार, दिसेल त्याच्यावर निशाणा का लावला नराधमांनी?

भारतातल्या टॉप-4 इलेक्ट्रिक स्कूटर, फास्ट चार्जिंग आणि 236KM पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.