Arvind Sawant | सुशील मोदी काल जन्मले, त्यांना महाराष्ट्राची काय माहिती? भाजप ज्या शिडीवरून चढते, तिलाच लाथाडते, अरविंद सावंतांची जहरी टीका!
भाजपच्या देशातील रणनीतीवर टीका करताना अरविंद सावंत म्हणाले, ' धोका देण्याचा त्यांचा पायंडा आहे. भाजपात हा दुर्गुण आहे. कश्मीरपासून हरियाणा, नितीश कुमारांपर्यंत याची उदाहरणं मिळतील. अगदी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचंही काय झालं, हे सर्वांना माहिती आहे.
मुंबईः भारतीय जनता पार्टी (Bhartiya Janata Party) ज्या शिडीवरून चढते, त्याच शिडीला लाथ मारते. ही त्यांची खास कार्यपद्धती आहे. बिहारमध्ये ज्या प्रमाणे नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा छळवाद सुरु होता, तसा आमचाही झाला. महाराष्ट्रात ठेच लागली, नितीश कुमार शाहणे झाले, असं थेट वक्तव्य शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind sawant) यांनी केलंय. भाजपने महाराष्ट्र आणि बिहारमध्येच नाही तर हरियाणा, मध्यप्रदेशात अगदी गोव्यातदेखील असेच राजकारण केल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली. सुशील मोदींना महाराष्ट्रात शिवसेनेसोबत काय राजकारण खेळलं गेलं, हे माहिती नाही. त्यांनी एकदा स्वतःचाच इतिहास काढून वाचावा, असा सल्ला अरविंद सावंतांनी दिलाय..
‘बिहारमध्ये खऱ्या अर्थानं क्रांती’
बिहारमधील सत्तांतरावर भाष्य करताना अरविंद सावंत म्हणाले, ‘भाजपने इंग्रजांचीच नीती अवलंबली आहे. ज्या शिडीवरून चढतात, त्याच शिडीला लाथ मारतात. ही त्यांची खास कार्यपद्धती आहे. आमचा इथं छळवाद सुरु होता, तसा तिथे नितीश कुमारांचा होता. त्यामुळेच नितीश कुमारांच्या एका मंत्र्यानं राजीनामा दिला. पुढच्यास ठेस मागचा शहाणा, असं आपण म्हणतो. महाराष्ट्रात ठेच लागली, नितीश कुमार शाहणे झाले. त्यांना भाजपचं कटकारस्थान लक्षात आलं. त्यांनी डाव उलटा टाकला. म्हणून भाजप हडबडलेत. तिकडं 9 ऑगस्टला खऱ्या अर्थानं क्रांती झाली…
‘प्रत्येक राज्यात भाजपा घात करते..’
भाजपच्या देशातील रणनीतीवर टीका करताना अरविंद सावंत म्हणाले, ‘ धोका देण्याचा पायंडा … भाजपात हा दुर्गुण आहे. कश्मीरपासून हरियाणा, नितीश कुमारांपर्यंत याची उदाहरणं मिळतील. अगदी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचंही काय झालं, घात कुणी केला… हे मोदी बिदी काल जन्माला आलेले. त्यांना काय महाराष्ट्राचं माहिती? हरियाणात खट्टरचा प्रचार केला.. तत्कालीन अरुण जेठली यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार दाखवून मतदान केलं. आणि सत्तेवर आल्यावर कुणाला मुख्यमंत्री केलं? मुफ्ती मोहम्मद यांच्यासोबत जाताना कुणाच्या पठित खंजीर खुपसला? हिंदुत्वाच्या, ३७० च्या की कश्मीरमधील हिंदु बांधवांच्या? हे लोक माहिर आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या निवडून आलेल्या आमदारांना राजीनामा द्यायला लावला. आम्ही असं कुठे केलंय?
महाराष्ट्रात नेमकं काय झालं?
महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेच्या पाठित सुरा खुपसल्याचा आरोप अरविंद सावंतांनी केला. ते म्हणाले, विधानसभेत युती झाल्यानंतरही ते पाडण्याचे प्रयत्न झाले. म्हणून आम्ही 56 वर आलो… 2014 ला विधानसभेत युती तोडली. ते लोकसभेत होते. चार महिन्यात युती तोडली. तेव्हाही राज्यात पंतप्रधानांपासून सर्व नेत्यांच्या सभा झाल्या. शिवसेनेच्या खच्चीकरणासाठी सभा घेतल्या. ते कुणाला पराभूत करण्यासाठी? काँग्रेस तर लोकसभेत पराभूत झाली होती.. मग कुणासाठी एवढ्या सभा घेतल्या होत्या? शिवसेनेच्या खच्चीकरणासाठी… 2019 मध्ये उदार अंतःकरणाने उद्धव साहेबांनी सामावून घेतलं. त्यांनी शब्द दिला. तो शब्द देताना सुशील मोदी होते का? नाही… तो शब्द फिरवला म्हणून हे झालं… अमित शहांनी शब्द दिला होता. महाराष्ट्रात त्रांगडं झालं तेव्हा ते इथे फिरकले का? तेव्हा ते हरियाणात गेले होते. ते सहा महिन्यानंतर बोलले… मी असं बोललो नव्हतं. त्यामुळे मोदींना सांगा.. तुमचा स्वतःचा इतिहास वाचा….