ठरलं! शिवसेनेचा एकमेव मंत्री, उद्धव ठाकरेंकडून नावावर शिक्कामोर्तब
मुंबई : लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवणाऱ्या भाजपप्रणित एनडीए सरकारचा आज शपथविधी सोहळा आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची आज शपथ घेतील. त्यासोबत, काही मंत्रीही शपथग्रहण करतील. शिवसेनेकडून आज एकच मंत्री शपथ घेणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. “शिवसेनेकडून अरविंद सावंत यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलीय, […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवणाऱ्या भाजपप्रणित एनडीए सरकारचा आज शपथविधी सोहळा आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची आज शपथ घेतील. त्यासोबत, काही मंत्रीही शपथग्रहण करतील. शिवसेनेकडून आज एकच मंत्री शपथ घेणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
“शिवसेनेकडून अरविंद सावंत यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलीय, ही माहिती खरी आहे. शिवसेना कोणत्याही खात्याचे सोने करेल. जसं मागे शिवसेनेकडे अवजड उद्योग खात होते.”, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितले.
कोण आहेत अरविंद सावंत?
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवेसेनेच्या अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा पराभव केला. दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. मिलिंद देवरा सलग दोन वेळा 2004 आणि 2009 मध्ये निवडून आले. मात्र 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव करुन शिवसेनेचे अरविंद सावंत खासदार झाले.
त्यांतर यंदा म्हणजे 2019 साली पुन्हा एकदा अरविंद सावंत यांनी दक्षिण मुंबईतून काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला.
Sanjay Raut, Shiv Sena: It is decided that there will be one minister from each ally https://t.co/3UX0YjReNj
— ANI (@ANI) May 30, 2019
उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीला रवाना
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी ‘मातोश्री’वरून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. हजारो पाहुण्यांच्या उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी 7 वाजता मोदींचा शपथविधी होईल. अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांसह दिग्गजांना या शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आलंय.