Eknath Shinde: संजय राऊतांनी दिलेल्या तीन कबुली, ज्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडावर शिक्कामोर्तब होतंय, शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर

Eknath Shinde: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलता बोलता काही संकेतही दिले आहेत. मुख्यमंत्री अनेक खात्यांचा आढावा घेत असतात.

Eknath Shinde: संजय राऊतांनी दिलेल्या तीन कबुली, ज्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडावर शिक्कामोर्तब होतंय, शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 11:42 AM

मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पक्षातच बंड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहेत. शिंदे यांनी आपल्याच सर्वोच्च नेत्याच्या नेतृत्वाखालील सरकारला सुरुंग लावण्याचं काम केलं आहे. शिंदे यांच्या या बंडाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनीही गंभीर दखल घेतली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी स्वत: मीडियासमोर येऊन शिंदे यांच्या बंडावर भाष्य केलं आहे. यावेळी राऊत यांनी शिंदे यांना निष्ठावंत शिवसैनिक असल्याचं सांगत ते बंड करणार नाहीत, असं वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. पण याचवेळी त्यांनी बंड झाल्याची कबुलीही दिली. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसून येत आहे. संजय राऊत यांच्या या कबुलीमुळे केवळ शिवसेनाच फुटीच्या उंबरठ्यावर नाही तर महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे संकेतही मिळत आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलता बोलता काही संकेतही दिले आहेत. मुख्यमंत्री अनेक खात्यांचा आढावा घेत असतात. तसे ते अनेक खात्यांचा घेतात. त्यातून काही गैरसमज असतील तर दूर करू, माझं आणि शरद पवारांचं बोलण सुरू आहे. पवार आता दिल्लीत पोहोचतील. उद्धवजी मला म्हणाले इथेच थांबा. म्हणून मी इथे आहे. पक्षप्रमुखांशी आणि आम्ही सर्व सहकारी एकमेकांशी बोलतोय. राजकारणात अशा प्रसंगांना समोर जावं जागतं. भाजपने आधीही एक प्रयोग केला. तो यशस्वी झाला नाही. म्हणून थांबून हा दुसरा घाव पाठीवर घालत आहेत. आम्ही छातीवर घाव घेणारे आहोत. एकनाथ शिंदेंचं आयुष्य हे शिवसेनेत गेलं आहे. सर्व आंदोलनात ते बरोबर होते. बाळासाहेबांबरोबर होते. ते दबाव आणत आहेत. अनिल परबांना आजच ईडीची नोटीस का? हे समजून घेतलं गेलं पाहिजे, महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम होतंय, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

पहिली कबुली

एकनाथ शिंदे हे मुंबईच्या बाहेर आहेत. त्यांच्याशीही संपर्क झाला आहे. या सर्वांना गुजरातमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यातील काही आमदारांना परत यायचं आहे. पण त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. त्यांना परत येऊ दिलं जात नाही. मध्यप्रदेश आणि राजस्थान पॅटर्न करण्याचा हा प्रयत्न आहे, असं संजय राऊत यांनी सांगून राज्यात बंड झाल्याची कबुली दिली आहे.

दुसरी कबुली

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले हे सर्व आमदार जुने शिवसैनिक आहेत. शिवसेनेच्या पडत्या काळातही ते आमच्या सोबत होते. ते निष्ठावंत आहेत, ते परत येतीलच, असंही सांगून राऊत यांनी निष्ठावंत आमदारही शिंदे यांच्यासोबत असल्याचं सांगितलं जात आहे.

तिसरी कबुली

जे आमदार इथे नाहीत ते सांगतात की आम्हाला काय झालंय कळत नाही. हे आमदार गुजरातमध्ये, सुरतमध्ये आहेत. त्या आमदारांची व्यवस्था भाजप नेते आरसी पाटील करत आहे. सुरतलाच का नेलं? ज्या क्षणी आमचा संपर्क होईल त्या क्षणी ते परत येतील, असं विधान करत राऊत यांनी शिवसेनेत मोठं बंड झाल्याचं स्पष्ट केलं आहे. या बंडाचे कर्तेकरविते एकनाथ शिंदे असल्याचंही त्यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.