Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल दीड तास चर्चा, पण 20 मिनिटात पवारांची भेट घेऊन संजय राऊत परतले

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. या भेटीनंतर लगेचच संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक इथे दाखल झाले.

मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल दीड तास चर्चा, पण 20 मिनिटात पवारांची भेट घेऊन संजय राऊत परतले
शरद पवार, संजय राऊत , उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 5:15 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. या भेटीनंतर लगेचच संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक इथे दाखल झाले. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तीन दिवसात दोनवेळा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा इथे या दोघांची भेट झाली. जवळपास दीड तास संजय राऊत हे वर्षा बंगल्यावर होते. (Shiv Sena MP Sanjay Raut discussed An hour and a half with Chief Minister Uddhav Thackeray but in 20 minutes Raut returned after meeting Sharad Pawar)

वर्षा बंगल्यावरुन संजय राऊत थेट सिल्व्हर ओकवर दाखल झाले. इथे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसोबत दीड तास चर्चा केली. मात्र शरद पवारांसोबत केवळ 15 ते 20 मिनिटांचीच चर्चा झाली.

पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत काय म्हणाले?

या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले, “शरद पवारांना सहज भेटलो, काहीही घडामोडी नाहीत, मुख्यमंत्र्यांचा काही निरोप असेल तर तुम्हाला (मीडियाला) कशाला सांगू, पवार साहेबांना सांगेन, हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल, उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत असं शरद पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात या सरकारचं काम चालेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी सिल्व्हर ओकवरुन बाहेर आल्यानंतर दिली.

मुख्यमंत्री-संजय राऊत दुसऱ्यांदा भेट

दरम्यान, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तीन दिवसात दोनवेळा भेट घेतली. संजय राऊत आज वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर तिथूनच संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर रवाना झाले.

संजय राऊत हे दोन दिवसात सातत्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी भेटत आहेत. तीन दिवसापूर्वी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर दोन तास चर्चा झाली होती. त्यानंतर आज दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं झाली. या चर्चेनंतर लगेचच संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय, याचे आडाखे राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत.

VIDEO : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

संबंधित बातम्या 

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर लगेचच संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, महाविकास आघाडीत चाललंय काय?  

संजय राऊत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, तीन दिवसातील दुसरी भेट! पडद्यामागे काय शिजतंय?

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.