मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर (Matoshree) दाखल झाले आहेत. संजय राऊत यांनी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहात का असा प्रश्न टीव्ही 9 ने संजय राऊत यांना विचारला. त्यावेळी संजय राऊत म्हणाले, मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलो आहे. (Shiv Sena MP Sanjay Raut meet CM Uddhav Thackeray at Matoshree live update)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. त्या भेटीत वैयक्तिक चर्चा झाली होती. त्यानंतर शरद पवारांचा दिल्ली दौरा, तिसरी आघाडीची मोर्चेबांधणी आणि त्यानंतर लगेचच संजय राऊत यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांचा निरोप घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
संजय राऊत हे शरद पवारांना भेटल्यानंतर त्यांनी ट्विट केलं होतं. “मा.श्री.शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरतेसंदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही. उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत असे श्री.पवार म्हणाले”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं.
मा.श्री.शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा
झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरते संदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही.
उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत असे श्री.पवार म्हणाले. @PawarSpeaks @OfficeofUT— Sanjay Raut (@rautsanjay61) June 23, 2021
संबंधित बातम्या
महाराष्ट्र सरकारच्या स्थिरतेबाबत पवारांच्या मनात शंका नाही, पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचं ट्वीट
‘कर नाही, तर डर कशाला, वड्यांचं तेल वांग्यावर कशाला काढता’, दरेकरांचा राऊतांना टोला