भाजपने सरकारी कंपन्यांप्रमाणे तपासयंत्रणा आणि तुरुंगांचेही खासगीकरण केलेय: संजय राऊत

Sanjay Raut| देशातील अनेक सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण मोदी यांच्या सरकारने केले. अनेक सरकारी कंपन्या आपल्या मर्जीतील उद्योगपतींना विकण्यात आल्या. ‘‘दोघेजण विकायला बसलेत व दोघेच जण खरेदी करतात,’’ अशी टवाळी त्यावर सुरू आहे.

भाजपने सरकारी कंपन्यांप्रमाणे तपासयंत्रणा आणि तुरुंगांचेही खासगीकरण केलेय: संजय राऊत
संजय राऊत, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 7:22 AM

मुंबई: दिवाळीनंतर महाराष्ट्रातील आणखी काही मंत्र्यांना तुरुंगात पाठवू अशी वाचाळकी भाजपचे लोक रोज करतात. तसेच ईडी, सीबीआय आणि एनसीबी ज्याप्रकारे काम करीत आहेत ते पाहता देशातील तपासयंत्रणा आणि तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय, असा प्रश्न पडत असल्याची खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील ‘रोखठोक’ या सदरातून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले आहे.

देशातील अनेक सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण मोदी यांच्या सरकारने केले. अनेक सरकारी कंपन्या आपल्या मर्जीतील उद्योगपतींना विकण्यात आल्या. ‘‘दोघेजण विकायला बसलेत व दोघेच जण खरेदी करतात,’’ अशी टवाळी त्यावर सुरू आहे. आता रेल्वेपासून एअर इंडियापर्यंत सगळेच खासगी झाले. त्याचवेळी महाराष्ट्रात याला तुरुंगात टाकू व त्यालाही तुरुंगात टाकू, असे भाजपचे नेते रोज सकाळी उठून सांगतात. तेव्हा देशातील तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय? असा प्रश्न पडतो. मोदी है तो मुमकीन है! हे अशा वेळी खरे वाटते. 2024 पर्यंत हे सहन करावेच लागेल. संपूर्ण देशच हळूहळू तुरुंग होताना दिसत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

‘इंधन पाच रुपयांनी स्वस्त होणे, हा दिलासा नव्हे’

केंद्र सरकारने पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त केले. यामुळे ‘भाजप’चे लोक खूश झाले व पहा आपले पंतप्रधान किती मोठय़ा मनाचे असे सांगू लागले. शंभरी पार केल्यावर पाच-दहा रुपये कमी करणे हा दिलासा म्हणता येणार नाही. 13 राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाल्यावर हे पाच रुपये कमी केले. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष महागाईवर बोलत नाही. पेट्रोल 5 रुपयांनी कमी केले म्हणून ते बागडत आहेत, पण 5 रुपये कमी करूनही पेट्रोल-डिझेल शंभरीपार आहे. आज पेट्रोल 115 रुपये आणि डिझेल 107 रुपये. म्हणजे शंभरीचा पारा उतरायला तयार नाही, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातम्या:

अनिल देशमुख, आर्यन खान, नवाब मलिकांचे जावई ते एकनाथ खडसे; संजय राऊतांच्या ‘रोखठोक’ 5 भूमिका

पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का, दिल्लीत आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; मोदी-शहा आखणार नवी रणनीती

‘पेडलरची बायको म्हणून हिणवलं, मुलांनी मित्र गमावले’, नवाब मलिकांची मुलगी निलोफरचे खुले पत्र

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.