Sanjay Raut | फुटीर गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतात? राऊतांचा सवाल

लोकसभेतील शिवसेना खासदारही बंडखोरीच्या पावित्र्यात असल्याचं वृत्त आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ' शिवसेनेचे खासदार फुटीर गटाबरोबर बैठका घेत असेल तर कारवाई केली जाईल.

Sanjay Raut | फुटीर गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतात? राऊतांचा सवाल
पत्रकार परिषदेतील पाच मुद्दे Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 6:50 PM

मुंबईः फुटीर गटाच्या भवितव्याचाच प्रश्न खंडपीठात आहे. तर हा गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतो, असा संतप्त सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी विचारला आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गटाला मान्यता नाही. त्यांचा पक्षही नाही. तरीही हे लोक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करत आहे, मात्र यांना असा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला ठणकावून सांगितलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या परस्पर विरोधी याचिकांवरून येत्या 20 जुलै रोजी घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. तत्पुर्वी एकनाथ शिंदे गटाच्या वतीने शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. मात्र ज्या गटाला मान्यताच नाही, त्यांनी अशी कार्यकारिणी जाहीर कशी केली, असा सवाल संजय राऊत यांनी दिला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

एकनाथ शिंदे गटाने जाहीर केलेल्या कार्यकारिणीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ खंडपीठात फुटीर गटाच्या भवितव्याचा निर्णय लागेल. आम्हाला खात्री आहे. जी याचिका शिवसेनेची आहे. ती कायद्याच्या आधारे पक्की आहे. आम्हाला न्याय मिळेल म्हणून त्या भीतीतून एक गट शिवसेनेची कार्यकारिणी कसा काय बरखास्त करू शकतो. त्या गटाला मान्यता नाही. पक्षही त्यांचा नाही हे लोक बाळासाहेबांचा पक्षाची कार्यकारीणीच बरखास्त करत आहे. कातडी वाचवण्यासाठी फुटून गेलेले आमदार वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. शिवसेनेचे नेतेमंडळ हे बाळासाहेब ठाकरे आणि कार्यकारिणीने तयार केले आहे. शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. हा गट नाही. ही ठाकरेंची शिवसेना आहे. त्यांना आमची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार नाही. कायद्यानेही नाही. लोकांना भ्रमित करण्याचाहा प्रकार आहे. त्याचा सेनेवर परिणाम होणार नाही… अशी स्पष्टोक्ती राऊतांनी केली आहे.

‘कॉ़मेडी एक्सप्रेसचा सीझन 2’

आम्ही मुख्यप्रतोदपदी राजन विचारे यांची नेमणूक कायद्याच्या आधारे केली आहे. तेच राहतील. स्वतः मुख्यमंत्र्याच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. अपात्रतेसाठी जी 16 नाव दिलं त्यात मुख्यमंत्र्यांचं नाव पहिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथच बेकायदेशीर आहे. मुख्यमंत्री येतील. त्याची खुर्ची वाचवण्यासाठी येतील. पण या देशातील न्याय मेला नाही याची मला खात्री आहे. सर्वोच्च न्यायालयात न्याय होईल. कलाबेन डेलकर बाहेर आहेत. अजून काही बाहेर आहेत. किर्तीकर आजारी आहेत. तुम्ही आकडे मोजतात. ते जे आकडे देत आहेत. ते लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी देत आहे. ही फसवाफसवी सुरू आहेत. आता कॉमेडी एक्सप्रेसचा सीजन टू सुरू आहे. लोक मजा घेत आहे. फुटून गेलेले लोक आहेत बाहेर. तुम्ही म्हणता आमची शिवसेना. कोणत्या आधारे म्हणता. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. ती शिवसेना भवनातून सुरू राहील. तुम्ही तुमचा खुशाल वेगळा संसार मांडा, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

‘फुटीर खासदारांवरही कारवाई’

लोकसभेतील शिवसेना खासदारही बंडखोरीच्या पावित्र्यात असल्याचं वृत्त आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ‘ शिवसेनेचे खासदार फुटीर गटाबरोबर बैठका घेत असेल तर कारवाई केली जाईल. त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला कोणताही आधार नाही. एक फुटीर गट मूळ पक्षाची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतो. त्यांना अधिकारच नाही.

Non Stop LIVE Update
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.