कोण पार्थ पवार? मी नाही ओळखत, पुढचा खासदार मीच : श्रीरंग बारणे

पिंपरी चिंचवड : लोकसभेच्या निवडणुका तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. कारण या जागेवरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह सर्वच प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठं आव्हान निर्माण होईल, हे निश्चित. मात्र, खासदार श्रीरंग बारणे […]

कोण पार्थ पवार? मी नाही ओळखत, पुढचा खासदार मीच : श्रीरंग बारणे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

पिंपरी चिंचवड : लोकसभेच्या निवडणुका तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. कारण या जागेवरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह सर्वच प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठं आव्हान निर्माण होईल, हे निश्चित. मात्र, खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘पार्थ पवार’ हे आपल्यासाठी आव्हान नसल्याचे म्हटले आहे. शिवाय, आपण अत्यंत बिनधास्त असून, सहज पुन्हा खासदार होऊ, अशा तोऱ्यातच श्रीरंग बारणे यावर प्रतिक्रिया दिली आहे.

श्रीरंग बारणे काय म्हणाले?

“कोण पार्थ पवार? मी ओळखत नाही. अजित पवारांचा मुलगा आहे. त्याला फ्लेक्सवर झळकावं लागतं.” असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले. तसेच, 2019 ला म्हणजे पुढचा खासदार मीच असेन, असा विश्वासही बारणेही व्यक्त केला.

“पार्थ पवार आला किंवा दुसरा कोणता पवार आला, याची मला चिंता नाही. ती चिंता पवारांना असल्यामुळे ते फ्लेक्सबाजी करत असतील.” असा टोलाही खासदार श्रीरंग बारणेंनी लगावला आहे.

‘टीव्ही 9 मराठी’च्या बातमीची दखल घेत, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांच्या नावाच्या चर्चेवर आपली प्रतिक्रिया दिली.

मावळमध्ये कोण प्रतिस्पर्धी असणार?

शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. लक्ष्मण जगताप (भाजप), संजोग वाघिरे (राष्ट्रवादी कांग्रेस), माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे खासदार बारणे यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी असतील. त्यात पार्थ पवार यांचे आव्हान सगळ्यात कठीण मानले जात आहे. कारण पार्थ पवार यांनी आव्हान म्हणजे थेट अजित पवारांशी पंगा, अशी एकंदरीत स्थिती आहे. त्यामुळे जर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचे नाव पुढे आले, तर मोठमोठे उमेदवार सुद्धा उमेदवारीवर पुनर्विचार करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पार्थ पवारांच्या नुसत्या नावाने भल्याभल्यांची सपशेल माघार

मावळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा गेल्या 10 वर्षीपासून फडकत आहे. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उडी घेतलेली पहायला मिळत आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे या मतदारसंघामधून लढण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहरामधील राजकारणात पार्थ पवार सक्रीय झाल्याचे समोर आले आहे. दस्तुरखुद्द अजित पवार यांचे पुत्र मावळ लोकसभा मतदारसंघात उतरणार म्हणल्यावर मावळमधील बहुतांश दिगग्ज उमेदवारांनी आपली तलवार आधीच म्यान केलेली दिसत आहे. पार्थ पवार म्हणजेच पर्यायाने अजित पवार यांच्यासोबत लढत करण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजप अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप असतील किंवा अन्य पक्षांचे उमेदवार असतील यांनी सपशेल माघार घेतलेली दिसत आहे. पार्थ पवार यांच्या रूपाने अजित पवार यांना अंगावर घेणे जड जाणार या उद्देशाने यांनी आपली तलवार म्यान केलेली दिसत आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाची रचना आणि सद्यस्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे. पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि रायगडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघांचा मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ बनला आहे.

  • पिंपरी (पुणे) – गौतम चाबुकस्वार, शिवसेना
  • चिंचवड (पुणे) – लक्ष्मण जगताप, भाजपा
  • मावळ (पुणे) – संजय उर्फ बाळा भेगडे, भाजपा
  • कर्जत (रायगड) – आ. सुरेश लाड, राष्ट्रवादी काँग्रेस
  • उरण (रायगड) – आ. मनोहर भोईर, शिवसेना.
  • पनवेल (रायगड) – आ. प्रशांत ठाकूर, भाजपा

पिंपरी चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील सहा मतदार संघाचा मावळ लोकसभा मतदार संघ बनलाय. त्यामुळे साहजिकच इथल्या समस्याही वेगळ्या आहेत. रायगड हा कोकणातला भाग आहे, त्यामुळे कोकणातल्या ज्या समस्या आहेत, त्याच समस्या इथल्या लोकांना आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या वेगळ्याच आहेत.

संबंधित बातमी : मावळ लोकसभा : पार्थ पवारांच्या नुसत्या नावाने भल्याभल्यांची सपशेल माघार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.