नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांच्या जमिनी; राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं: विनायक राऊत

आजही नाणारमधील अनेक रहिवाशांचा या प्रकल्पाला विरोध आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचं धाडस करावं. | Vinayak Raut

नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांच्या जमिनी; राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं: विनायक राऊत
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीतही नाणारवासियांनी रिफायनरी प्रकल्पाच्याविरोधात कौल दिल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत रिफायनरी समर्थकांना अवघी दोन ते तीन मते पडली.
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 12:44 PM

मुंबई: काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) नाणार तेलशुद्धीकरण (Nanar Project) प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. मग आताच त्यांचं मतपरिवर्तन का झालं, असा सवाल शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी उपस्थित केला. नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांनी जमिनी घेतल्या आहेत. त्यांच्या फायद्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) ही मागणी करत आहेत का खरंच कोकणाच्या हितासाठी त्यांनी ही मागणी केली आहे, याची मला कल्पना नसल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले. (Shivsena leader Vinayak Raut slams Raj Thackeray over Nanar project)

नाणार प्रकल्पासंदर्भात पुनर्विचार करावा, असे पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या नाणारविषयी बदललेल्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली. आजही नाणारमधील अनेक रहिवाशांचा या प्रकल्पाला विरोध आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचं धाडस करावं, असे आव्हान विनायक राऊत यांनी दिले.

तसेच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीतही नाणारवासियांनी रिफायनरी प्रकल्पाच्याविरोधात कौल दिल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत रिफायनरी समर्थकांना अवघी दोन ते तीन मते पडली. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा स्पष्ट विरोध आहे, हे दिसत असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले.

राज ठाकरेंनी पत्रात नेमंक काय म्हटलंय?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. ‘नाणार रिफायनरी’ प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही. राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर या प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमिका घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

मनसे सहकार्य करणार, आराखडाही देणार

सरकारने नाणारबाबत सकारात्मक भूमिका घेतली तर मी आणि माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. एवढंच नव्हे तर पर्यावरण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने एक विकास आराखडा तयार करून आम्ही तो आपणांस सादर करू, असं सांगतानाच सद्यपरिस्थितीत महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी असे निर्णय घेणं ही काळाची गरज आहे. कोणी काहीही म्हणू दे .. महाराष्ट्र फर्स्ट .. असं धडाकेबाज धोरण असायला हवं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

पेट्रोलचे दर वाढल्याने महाराष्ट्रातील ‘या’ शहरात इलेक्ट्रिक वाहनं आऊट ऑफ स्टॉक

‘जनता महाविकासआघाडीच्या कामावर समाधानी, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणं अशक्य’

Geranium Farming| नांदेडच्या युवा शेतकऱ्यांनी करुन दाखवलं, जिरेनियम शेतीद्वारे लाखोंची कमाई

LIVE | ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ प्रकल्पाचा विचार करा; राज ठाकरे यांचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

(Shivsena leader Vinayak Raut slams Raj Thackeray over Nanar project)

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.