Shiv Sena : शिवसेनेत हकापलट्टीचं सत्र सुरुच! आता विजय शिवतारे यांची ठाकरेंकडून हकालपट्टी
Vijay Shivtare : पुरंदर तालुक्यात शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पेटण्याची चिन्हा आहेत
मुंबई : शिवसेनेतून (Shiv sena News) नेते, पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचं सत्र सुरु आहे. शिवसेना फुटल्यानंतर पक्ष बांधणी नव्यानं करण्याचा प्रयजोन केलेल्या उद्धव ठाकरेंनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. आता विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तसे आदेश जारी केले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पक्षाच्या विरोधात काम केल्यानं आणि पक्षाची शिस्त मोडल्यानंतर विजय शिवतारे यांना शिवसेनेनं अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार असून ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचं प्रतिनिधीत्व करत होते. विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर त्यांच्यावर हकालपट्टी कारवाई करण्यात आली आहे. विजय शिवतारे यांनी आपण शिंदे गटात जात असल्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता.
पुरंदर तालुक्यात संघर्ष!
आता पुरंदर तालुक्यात शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पेटण्याची चिन्हा आहेत. शिवतारे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता विजय शिवतारे समर्थक आणि इतर शिवसैनिक यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. वेगवेगळी भूमिका घेतल्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ लागलं आहे. अशातच ज्यांना विजय शिवतारे यांची भूमिका मान्य नाही, त्यांना व्हॉट्सऍप ग्रूपमध्य वगळा, असे आदेश विजय शिवतारे यांनी दिले आहेत. पुरंदर तालुक्यातील गावागावात बनवण्यात आलेल्या व्हॉट्सऍप ग्रुपमधून शिवतारे यांच्या भूमिकेला बगल देणाऱ्यांना रिमूव्ह करण्याचा एकप्रकारे निर्देश देण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदे सतर्क!
शिवतारेंच्या समर्थनानंतर आता एकनाथ शिंदेही सतर्क झालेत. शिवतारे यांना एकीकडे शिवसेनेतून नारळ दिलेला असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरंतर तालुक्याचा आढावा घेतला जाणार आहे. विजय शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यात मुंबईतून निरीक्षक पाठवून बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला कार्यकर्त्यांना हजर राहण्याचेही आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे या बैठकीला नेमके किती शिवसैनिक उपस्थित राहतात, हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील वेगवेगळ्या मतदार संघांचा आढावा घेतला जातोय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना भवनात बैठकांचा धडाका सुरुच आहे.
आतापर्यंत शिवसेनेनं कुणाकुणाची हकालपट्टी?
- शितल म्हात्रे
- गौरी खानविलकर
- रवींद्र फाटक
- राजेश शहा
- उदय सामंत समर्थकांची हकालपट्टी
- नवी मुंबईतील पदाधिकारी
- ठाणे, पालघरमधील पदाधिकारी
- संतोष बांगर
- विजय नाहटा
- विजय चौगुले