आपल्या तरुण-तरुणींनी करायचे काय?, शिवसेनेचा आक्रोश; 29 सेकंदाच्या व्हिडीओत आणखी काय?

उद्या दिनांक 24 सप्टेंबर रोजी शिवसेनेने जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन केलं आहे. दुपारी 4 वाजता मावळ पंचायत समिती कार्यालयासमोर, वडगाव मावळ, जिल्हा पुणे येथे ही रॅली होणार आहे.

आपल्या तरुण-तरुणींनी करायचे काय?, शिवसेनेचा आक्रोश; 29 सेकंदाच्या व्हिडीओत आणखी काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 11:34 AM

पुणे: वेदांता प्रकल्पावरून (vedanta project) राज्य सरकारकडून कितीही सारवासारव केली जात असली तरी शिवसेनेने मात्र हा मुद्दा अजूनही सोडलेला नाही. शिवसेनेने (shiv sena) हा मुद्दा आता जनतेच्या दरबारात नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना उद्या पुण्यात जोरदार आंदोलन करणार आहे. राज्य सरकारच्या विरोधात शिवसेनेने पुण्यात जन आक्रोश रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला शिवसेना नेते आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) संबोधित करणार आहेत. त्यामुळे या रॅलीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने हा मुद्दा हातात घेतल्याने राज्यातील शिंदे सरकारची चांगलीच कोंडी होणार असल्याचं दिसत आहे.

उद्या दिनांक 24 सप्टेंबर रोजी शिवसेनेने जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन केलं आहे. दुपारी 4 वाजता मावळ पंचायत समिती कार्यालयासमोर, वडगाव मावळ, जिल्हा पुणे येथे ही रॅली होणार आहे. शिवसेनेने या रॅलीसाठी आमचा रोजगार, आमचा हक्क ही टॅग लाईनही घेतली आहे. स्वत: शिवसेना नेते आदित्य ठाकरे या रॅलीला संबोधित करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

उद्या होणाऱ्या या जन आक्रोश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने एक 29 सेकंदाचा व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओतून शिवसेनेने राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच जन आक्रोश आंदोलन का घेण्यात आलं? याची माहितीही या व्हिडीओत देण्यात आली आहे.

या 29 सेकंदाच्या व्हिडीओत वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावर भाष्य करण्यात आलं आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प बाहेर गेला. महाराष्ट्रातील 1 लाख नोकऱ्या परराज्यात पाठवल्या. वेदांता फॉक्सकॉनला खोके सरकारने महाराष्ट्रातून गुजरातला पाठवले. आपल्या तरुण-तरुणींनी करायचे काय? जीत के हारनेवालो को खोके सरकार कहते है, असं या व्हिडीओत म्हटलं आहे.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.