Shivsena : पुण्यात शिवसेनेला भगदाड! नगरमध्येही परिस्थिती ढासळली; श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे शिंदे गटात सामील

पिंपरी चिंचवड, मावळ आणि पनवेल, उरण, खालापूर या भागांचा समावेळ असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व श्रीरंग बारणे करतात. अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील दिघोळचे लोखंडे 2014ला भाजपातून शिवसेनेत आले.

Shivsena : पुण्यात शिवसेनेला भगदाड! नगरमध्येही परिस्थिती ढासळली; श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे शिंदे गटात सामील
श्रीरंग बारणे/सदाशिव लोखंडेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 9:16 PM

पुणे : पुणे जिल्ह्यात शिवसेना (Shivsena) पक्षाला खिंडार पडले आहे. शिवसेनेचे दोन दिग्गज नेते शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेचे जिल्ह्यातील चार जिल्हाप्रमुखांपैकी दोन जिल्हा प्रमुख शिंदे गटात सामील झाले आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) तर शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्याबरोबरच जिल्हाप्रमुख शरद सोनवणे आणि रमेश कोंडे हेदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. पुणे जिल्ह्यात एकीकडे अशी स्थिती असताना अहमदनगरमध्येही काहीशी अशीच स्थिती निर्माण झाली आहे. शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर येथील कार्यालय आणि निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुण्यातील स्थिती काय?

पिंपरी चिंचवड, मावळ आणि पनवेल, उरण, खालापूर या भागांचा समावेळ असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व श्रीरंग बारणे करतात. खासदार बारणे हे सलग दोनवेळा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये बारणे यांची राजकीय ताकद आहे. त्यांचे पुतणे नगरसेवक राहिलेले आहेत. तर त्यांचा मुलगा विश्वजीत हे पिंपरी चिंचवड शहर युवासेना प्रमुख आहेत. श्रीरंग बारणे यांना पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, आकुर्डीतील माजी नगरसेवक प्रमोद कुटे, वाकड भागातील नगरसेविका रेखा दर्शिले, महिला संघटिका उर्मिला काळभोर, माजी शहरप्रमुख योगेश बाबर आदींचे समर्थन आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

शिर्डीतही सेनेला भगदाड?

शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडेहेदेखील शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आपण भाजपासोबत जावे, अशी भूमिका खासदार लोखंडे यांनी सातत्याने उद्धव ठाकरेंकडे मांडली होती. मात्र शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ न सोडल्याने खासदारच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटासोबत भाजपाला समर्थन करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर येथील कार्यालय आणि निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील दिघोळचे लोखंडे 2014ला भाजपातून शिवसेनेत आले. त्याचवेळी 2014 आणि 2019 असे सलग दोन वेळा शिर्डी लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत. आता ते भाजपाला समर्थन करत असल्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.