AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election: निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो: शिवसेना

तेजस्वी यांनी एकतर्फी वाटणाऱ्या बिहारच्या निवडणुकीत रंग भरण्याचे काम केले. | bihar election results 2020

Bihar Election: निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो: शिवसेना
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 7:50 AM

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप्रणित ‘एनडीए’ला कडवी टक्कर देणाऱ्या तेजस्वी यादव यांचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून कौतुक करण्यात आले आहे. निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो, अशी मार्मिक टिप्पणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. बिहारची सूत्रे कुणाच्या हातात जायची ते जातील, पण या निवडणुकीने देशाच्या राजकारणाला तेजस्वी नावाचा नवा मोहरा दिल्याचे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे. (Shivsena praises Tejaswi Yadav after bihar election results 20200

तेजस्वीची लढाई म्हणजे मोठा संघर्ष होता. तेजस्वीची कोंडी करण्याची एकही संधी दिल्ली व पाटण्याच्या सत्ताधाऱ्यांनी सोडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जंगलराजचे युवराज’ अशी निर्भत्सना करुनही तेजस्वी यादव यांनी संयम ढळून दिला नाही. पंधरा वर्षे बिहारवर राज्य करणाऱ्या नितीश कुमार यांच्यावर शेवटच्या टप्प्यात भावनिक आवाहन करण्याची वेळ आली. तेजस्वी यांनी एकतर्फी वाटणाऱ्या बिहारच्या निवडणुकीत रंग भरण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बलदंड नेत्यासमोर व बिहारमधील सत्ताधाऱ्यांच्या झुंडशाहीसमोर तो थांबला नाही व अडखळला नाही. याची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात कायम राहील, असे शिवसेनेने म्हटले आहे.

तत्पूर्वी मंगळवारी सकाळी बिहारमधील मतमोजणीला सुरुवात झाली होती. मात्र, मतमोजणीच्या संथ गतीमुळे निकालाचे चित्र स्पष्ट होण्यास मध्यरात्रीपर्यंतचा वेळ लागला. दरम्यानच्या काळात भाजप्रणित एनडीए आणि तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळाली. ताज्या आकडेवारीनुसार ‘एनडीए’ने बहुमताचा जादुई 122 आकडा गाठला आहे. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 125 जागांवर एनडीए तर 110 जागांवर महागठबंधनचे उमेदवार विजयी ठरले.

त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीए सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालंय. दुसरीकडे 75 जागांवर विजय मिळवत तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र, त्यांना सत्तास्थापनेसाठीच्या बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपने 74 जागांवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाची जागा घेतली. तर नितीशकुमारांचा संयुक्त जनता दलाने 43 जागांवर विजयाची नोंद केली. काँग्रेसला केवळ 19 जागांवर समाधान मानावे लागले.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजदचा पराभव

देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला, शरद पवारांची मिष्किल टिप्पणी

बिहारमध्ये ऑपरेशन लोटसप्रमाणे ऑपरेशन धनुष्यबाणही होऊ शकतं, निवडणुकीच्या निकालाआधी शिवसेनेचा इशारा

(Shivsena praises Tejaswi Yadav after bihar election results 20200

..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.