Shiv Sena : मराठा मतांसाठी शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती, मतभेद झाले तर काय ? पुरुषोत्तम खेडकर यांनी सांगितला मधला मार्ग..!

शिवसेनेतील वाढते बंड आणि भाजपसोबत शिंदेसेनेचे वाढते वजन पाहता आता शिवसेनेने थेट संभाजी ब्रिगेडसोबतच युती केली आहे. यामुळे प्रादेशिक पक्षाला बाजूला सारण्याचा डाव मोडीत काढण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे तर दुसरीकडे मराठा व्होट बॅंक हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीमुळे राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळणार का हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Shiv Sena : मराठा मतांसाठी शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती, मतभेद झाले तर काय ? पुरुषोत्तम खेडकर यांनी सांगितला मधला मार्ग..!
पुरुषोत्तम खेडकर
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 11:06 PM

पुणे : (Shiv Sena) शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीनंतर राज्याच्या राजकारणाला वेगळीच दिशा मिळणार का असे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेना आणि (Sambhaji Briged) संभाजी ब्रिगेडची युती होताच काही राजकीय नेत्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर खोचक टीका केली आहे. तर कोणताच पर्याय उरला नसल्याने (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. हे सर्व असले तरी, मराठा समाजाचे नेते पुरुषोत्तम खेडकर यांनी मात्र, या युतीचे स्वागत केले आहे. दोन्ही पक्षाची राजकीय गरज असल्याने ही युती झाली आहे. शिवाय यामुळे मराठा मते एकाच ठिकाणी राहण्यासही मदत होईल असा त्यांनी अंदाज लगावला आहे. त्यामुळे या अनपेक्षित युतीवर राजकीय गोठ्यातून वेगवेगळे मतप्रवाह असले तरी मात्र, पुरुषोत्तम खेडकर यांनी स्वागत आणि सल्लाही दिला आहे. शिवाय भविष्यात काही मतभेद झाले तरी ते वेळेनुसार आणि परस्थिती नुसार बदलण्याचे त्यांनी सांगितले आहे.

शिवसेना अन् संभाजी ब्रीगेडची युती

शिवसेनेतील वाढते बंड आणि भाजपसोबत शिंदेसेनेचे वाढते वजन पाहता आता शिवसेनेने थेट संभाजी ब्रिगेडसोबतच युती केली आहे. यामुळे प्रादेशिक पक्षाला बाजूला सारण्याचा डाव मोडीत काढण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे तर दुसरीकडे मराठा व्होट बॅंक हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीमुळे राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळणार का हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आता युती तर झाली पण जागा वाटाघाटी आणि इतर मुद्देही महत्वाचे आहेत.

राजकीय गरज निर्माण झाल्याने युती

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती ही राजकीय गरज असल्यामुळे झाली आहे. गेल्या अडीच महिन्यातील राजकीय स्थिती पाहता ही युती झाल्याने त्याचे स्वागतच असल्याचे मत पुरुषोत्तम खेडकर यांनी व्यक्त केले आहे. शिवाय यामुळे मराठा मते सेनेकडे वळवण्यासाठी याचा निश्चितच फायदा होणार आहे. असे असले तरी देन्ही गटाने किमान समान कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. यासाठी संभाजी ब्रिगेड महत्वाची भूमिका बजावेल असा आशावाद खेडकर यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रबोधनकारांच्या विचारांवर चालणारी सेना

शिवसेना पक्ष हा प्रबोधनकारांच्या विचारावर चालणारी सेना आहे. सेनेचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाहीय हे आधीच बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी काळात सेने पुन्हा उभारी घेईल, एवढेच नाहीतर दोन्हीमध्ये काही मतभेद निर्माण झाले तर परस्थितीनुसार योग्य ते बदलही करावे लागतील असेही पुरुषोत्तम खेडकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे युतीमुळे उभारी मिळणार असली तरी योग्य वेळी योग्य निर्णय महत्वाचे ठरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.