निवडणुकांबाबत संजय राऊत यांची वेगळी मागणी, त्यानंतर भाजपचा पराभवाचा दावा

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्याची झाडाझडती घेतली आहे. येत्या दोन, चार दिवसांत मी दिल्लीत जाणार आहे. त्यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

निवडणुकांबाबत संजय राऊत यांची वेगळी मागणी, त्यानंतर भाजपचा पराभवाचा दावा
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 10:22 AM

दत्ता कानवटे, दि. 6 जानेवारी 2024 | शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत निवडणुकांवरुन आक्रमक झाले आहेत. निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी त्यांनी नवीन मागणी केली आहे. भाजपची ईव्हीएमच्या (EVM) माध्यमातून हुकूमशाही सुरू आहे. मध्य प्रदेशाच्या निकलानंतर ईव्हीएमवर शंका बळकावल्या. 19 लाख ईव्हीएम चोरीला गेले आहे. ते कुठे गेले आहेत? हा प्रश्न करत हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. नरेंद्र मोदी यांना विष्णूचा 13 वा अवतार मानता, मग बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यावर 33 कोटी डोकी तुम्हाला वाचवू शकणार नाहीत. निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याचे आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले.

मराठवाड्याची झाडाझडती

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्याची झाडाझडती घेतली आहे. मराठवाड्यात राष्ट्रवादी, काँग्रेस अन् शिवसेना एकत्र लढणार आहे. वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर सकारात्मक आहेत. कुणीही मागच्या दाराने भाजपला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही. जागा वाटपसंदर्भात काँग्रेस सोबत चांगली बोलणी सुरु आहे. येत्या 2 ते 4 दिवसांत दिल्लीत जाणार आहे. त्यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. जो उमेदवार जिंकणार त्याला जागा देणार आहे. काँग्रेसने कोणत्याही जास्त जागा मागितल्या नाही.

ED पथकाला मारहाण म्हणजे लोकांचा संताप

देशात सध्या लोकांपर्यंत ED आणि EVM पसरला आहे. पश्चिम बंगालमध्ये ED पथकाला मारहाण म्हणजे लोकांचा संताप आहे. गिरीश महाजन यांचा भूकंपाच्या वक्तव्याचा राऊत यांनी समाचार घेतला. हा महाराष्ट्र आहे, जपान नाही. ED चा वापर करणे म्हणजे भूकंप नाही. मर्द असाल तर ED आणि पोलीस बाजूला ठेवून मैदानात या, असे आव्हान त्यांनी दिले. नरेंद्र मोदी यांना फक्त रोड शो आणि प्रचार करणे हे काम आहे. ते मणिपूर ला का जात नाही, काश्मिरी पंडितांच्या छावणीला का भेट देत नाही, असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांचा अपेक्षा भंग होईल

आम्ही त्यांच्या प्रेमात होतो. पण आमचा प्रेम भंग झाला. हे प्रेम फार काळ टिकत नाही. सत्ता गेली प्रेम जाते. एकनाथ शिंदे यांचाही अपेक्षाभंग होईल. आम्ही 25 वर्ष भाजपसोबत काढले. आम्हाला भाजप काय आहे, हे माहीत आहे. उद्धव ठाकरे यांनी घरी बसून महाराष्ट्र लुटला नाही तर वाचवला आहे, असे प्रत्युत्तर राऊत यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेवर केले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.