शिवसेनेची रणरागिणी चाकणकरांच्या मदतीला धावली, मनीषा कायंदेंकडून चित्रा वाघ यांचा खरपूस समाचार
राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांची महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना शूर्पणखेची उपमा दिली. याच टीकेनंतर शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे या रुपाली चाकणकर यांची ढाल म्हणून समोर आल्या आहेत. त्यांनी वाघ यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांची महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना शूर्पणखेची उपमा दिली. याच टीकेनंतर शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे या रुपाली चाकणकर यांची ढाल म्हणून समोर आल्या आहेत. त्यांनी वाघ यांच्यावर सडकून टीका केली आहे. एका महिलेला दुसऱ्या महिलेची प्रगती झालेली आवडली नाही. चित्रा वाघ कोणत्या मनोवृत्तीचे आहेत, हे त्यांनी दाखवून दिले आहे, असा घणाघात कायंदे यांनी केलाय.
मत्सरी मानसिकतेचे दर्शन घडवून आणले
एका महिलेला दुसऱ्या महिलेची प्रगती झालेली आवडली नाही. चित्रा वाघ यांनी आपण कोणत्या मनोवृत्तीचे आहोत हे दाखवून दिले आहे. खरंतर एक सहकारी म्हणून त्यांनी रुपाली चाकणकर यांना शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. परंतु त्यांनी चाकणकर यांना शूर्पणखेची उपमा दिली. त्यांनी मत्सरी मानसिकतेचे दर्शन घडवून आणले आहे. चित्राताई वाघ यांना एखादं मानाचं पद मिळालं तर आम्ही त्यांचं अभिनंदन केलं असतं, असं कायंदे म्हणाल्या.
राम नावाचे आमदार मुली पळवण्याची भाषा करतात
तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजप नेते राम कदम यांचा आधार घेत चित्रा वाघ यांच्यावर थेट हल्ला केला. “राम नावाचे आमदार मुली पळवण्याची भाषा करतात. त्यावर चित्राताई वाघ मात्र काहीच बोलणार नाहीत,” असं कायंदे म्हणाल्या आहेत.
चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या ?
“महिला आयोगाचा अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका,” असा हल्ला चित्रा वाघ यांनी केला. तसेच चाकणकरांची निवड झाली तर प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, अशी बोचरी टीकादेखील चित्रा वाघ यांनी केली.
चित्रा वाघ यांच्या टीकेवर उत्तर द्यायचे नाही
दरम्यान, चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर देण्याचे टाळले आहे. “माझ्या नावावर शिक्कामोर्तब वगैरे अशा बातम्या प्रसारमाध्यमांमधून ऐकते आहे. माझ्यापर्यंत कोणतीही अशी माहिती नाही. राष्ट्रवादी महिला संघटनेचं उत्तम काम सुरु आहे. मी समाधानी आहे. इच्छा वगैरे असा काही विषय नाही. चित्राताईंच्या ट्विटवर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
कोणत्याही मंत्रिपदावर नाही याचं दु:ख नाही, त्याची आठवणही काढत बसत नाही; पंकजा मुंडेंचा टोला कुणाला?
आमदारांना दिवाळीआधीच ठाकरे सरकारकडून गिफ्ट, विकासनिधीत घसघशीत वाढhttps://t.co/3PN8zwT6q0#mla #mlc | #mahavikasaghadi | #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2021
(shiv sena spokesperson manisha kayande criticizes chitra wagh)