महाविकास आघाडीतील आतली बातमी समोर, ग्रँड हयात हॉटेलमध्ये नेमकी खलबतं काय झाली?

महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची सविस्तर माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या गोटात सध्या महत्त्वाच्या हालचाली घडत आहेत. या हालचालींच्या पार्श्वभूमीवर मविआची आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

महाविकास आघाडीतील आतली बातमी समोर, ग्रँड हयात हॉटेलमध्ये नेमकी खलबतं काय झाली?
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 5:37 PM

मुंबई : 1 म्हणजे महाराष्ट्र दिवस. 1 म्हणजे कामगार दिवस. महाराष्ट्रासाठी हा खूप मोठा दिवस मानला जातो. याच दिवसाचं औचित्य साधून महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची मुंबईत भव्य अशी सभा आयोजित करण्यात आलीय. या सभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड हालचाली वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील ग्रँड हयात या मोठ्या हॉटेलमध्ये आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची आज ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीतली आतली बातमी आता समोर आली आहे.

या बैठकीसाठी शिवसेनेकडून स्वत: आदित्य ठाकरे, अनिल परब, अजय चौधरी, प्रकाश फातरफेकर, सूरज चव्हाण, मनीषा कायंदे, विठ्ठल मोरे अशा नेत्यांची टीम आली होती. तर राष्ट्रवादीकडून स्वत: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमोल मातेले, राखी जाधव, नरेंद्र राणे हे आले होते. तर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, नसीम खान आणि इतर नेते आले होते. जवळपास दीड तास सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाली.

या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती आता समोर आली आहे. बैठीनंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत भूमिका मांडली. “आपण सगळ्यांना माहिती आहे की, १ मे ला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पूर्वतयारी आज तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते, प्रमुख जबाबदार पदाधिकारी यांना बैठकीसाठी बोलावलं होतं. सभा यशस्वी करण्यासाठी जे नियोजन करावं लागतं त्या नियोजनासाठी आजची बैठक होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मार्गदर्शन केलं”, असं अनिल परब यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“ही सभा न भूतो न भविष्य व्हावी अशी करायची आहे. सभेत जी काही काळजी घ्यायची आहे, कारण सध्याच्या या परिस्थितीत सभा आयोजन करणं हे केवळ उद्दिष्टे नसून सभेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही अशा प्रकारे आयोजित करायची आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सभेसाठी यावं यासाठी ही बैठक होती. या सभेची रुपरेषा झाली आहे”, अशी माहिती परब यांनी दिली.

सभेला पोलिसांची अद्याप परवानगी नाही?

“पोलिसांशी बोलून झालंय. पोलिसांनी काही सूचना दिल्या आहेत. पार्किंगची व्यवस्था पासून सगळ्या गोष्टींवर मार्गदर्शन आज झालंय. लोकांना जाणं-येणं सोयिस्कर होईल, याची काळजी घेतली जाईल. त्या दिवशी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. सभाही मोठ्या उत्साहात होईल. सभेसाठी वेगवेगळ्या खात्यांची परवानगी घेतली जात आहे. सभेसाठी शंभर टक्के परवानगी मिळेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.