राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभले…उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांच्यावर मोठा हल्ला
uddhav thackeray on devendra fadnavis | देवेंद्र फडणवीस यांना निर्ढावलेला, निर्घृण, निर्दय मनाचा गृहमंत्री म्हणावे लागेल. त्यांना मी कलंक फडतूस म्हटले आहे. पण हे शब्द खूप सौम्य शब्द आहेत. त्यांना निर्घृण म्हणावे लागले, असा ल्ला उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबई, दि. 10 फेब्रुवारी 2024 | शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे. शब्दांचे तीक्ष्ण बाण सोडत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना कलंक, फडतूस म्हटले. पुढे जाऊन त्यांनी राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभल्याचा हल्ला केला. निर्ढावलेला, निर्घृण, निर्दय मनाचा गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे, या शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस यांनी मी कलंक फडतूस म्हटले आहे. हे शब्द खूप सौम्य शब्द आहेत. त्यांना निर्घृण म्हणावे लागले. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला की काय? असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. कायद्याचे धिंडवडे निघाल्यानंतर मंत्री जबाबदार असतात. मंत्र्यांकडून कारभार होत नसले तर मुख्यमंत्र्यांनी त्याला दूर केले पाहिजे. परंतु मुख्यमंत्रीच गुंडांना संरक्षण देत असल्याचे फोटो तुम्ही पाहात आहेत. त्यापेक्षा दुर्देवी म्हणजे शुक्रवारी फडणवीस जे बोलले तो विषय आहे. यामुळे त्यांना निर्ढावलेला, निर्घृण, निर्दय मनाचा गृहमंत्री म्हणावे लागेल. एक हत्या होत असताना तुम्ही त्याची बरोबरी श्वानासोबत करतात. तुम्ही तुमच्या शेपट्या दिल्लीत हालवतात. तिकडे तुम्ही श्वान आहात की काय? हे लोकांनी ओळखले आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
रश्मी शुक्ला यांचे पत्र…पण
आपले पोलीस २४ तासांच्या आता गुंडांना अटक करु शकतील. परंतु सरकार गुंडांना संरक्षण देत आहेत. यामुळे गुंडांना कायद्याची भीती राहिली नाही. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी कालच एक पत्र लिहिले. खरं म्हणजे असे पत्र अद्याप कोणत्याही महासंचालकांनी लिहिले नाही. हे पत्र म्हणजे पोलिसांवर जनतेचा विश्वास राहिला नाही, पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे, हे स्पष्ट आहे. राज्यात गुंडाचा हौदोस सुरु आहे. सध्याच्या सरकारच्या आश्रयाने गुंडगिरी सुरु आहे. या गुंडांचे सरकारमधील मंत्र्यांसोबतचे फोटो तुम्ही पाहात आहात. म्हणजेच सरकारकडून या गुंडांना संरक्षण मिळत आहे.
गोळ्या कोणी झाडल्या
फेसबुक लाईव्हमध्ये गोळ्या कोण झाडत आहे, हे कळत नाही. मॉरिस याने गोळ्या चालवल्या की अन्य कोणी? असा संशय उद्धव ठाकरे यांनी केला. “मॉरिसकडे परवानाधारक शस्त्र नव्हते. त्याने त्याचा बॉडीगार्ड मिश्राच शस्त्र वापरले. त्याने बॉडीगार्ड का ठेवला? त्याच्यावर ती वेळ का आली? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले. अभिषेकवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की, आणखी कोणी चालवल्या? मग या दोघांना मारण्याची सुपारी कोणी दिली? असा गंभीर प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारलाय.