प्रभादेवीनंतर आता धारावीत हायवोल्टेज ड्रामा! सदा सरवणकर आणि शिवसैनिक यांच्यात नेमकी का झाली बाचाबाची?

धारावीमध्ये आमदार सदा सरवणकर तसेच विभाग प्रमख गिरीश धानोळकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे पदाधिकारी निवडण्याबाबत मीटिंग ठेवण्यात आली होती. या दरम्यान काही शिवसैनिकांनी तिथ येऊन गोंधळ घातला, असा आरोप केला जातोय.

प्रभादेवीनंतर आता धारावीत हायवोल्टेज ड्रामा! सदा सरवणकर आणि शिवसैनिक यांच्यात नेमकी का झाली बाचाबाची?
पुन्हा राजकीय राडा?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 7:21 AM

अविनाश माने, प्रतिनिधी, मुंबई : प्रभादेवीतील (Prabhadevi) हायवोल्टेज राजकीय राड्यानंतर आता शिंदे गट आणि शिवसेना (Shinde group vs Thackeray Group) पुन्हा आमनेसामने आली आहे. गुरुवारी धारावीत (Dharavi Shiv sena News) सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. धारावीत शाखेच्या उद्घाटनावेळी सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये वाद झाला. या वादानंतर शिंदे गट आणि शिवसैनिक धारावी पोलीस स्थानकात दाखल झाले. त्यानंतर काही शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचीही माहिती समोर आलीय.

नेमकं काय झालं?

धारावीमध्ये आमदार सदा सरवणकर तसेच विभाग प्रमख गिरीश धानोळकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे पदाधिकारी निवडण्याबाबत मीटिंग ठेवण्यात आली होती. या दरम्यान काही शिवसैनिकांनी तिथं येऊन गोंधळ घातला, असा आरोप केला जातोय. यानंतर शिंदे गट आणि शिवसैनिक यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

अखेर शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे शिवसेनेच्या विरोधात तक्रार देण्यासाठी धारावी पोलीस स्थानकात पोहोचले. शिंदे गटाच्या तक्रारीनंतर अखेर ठाकरे गटाच्या काही कर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळतेय. याप्रकरणी आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

तक्रारीत काय?

रिडन फ्रान्सीस फर्नांडो यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तिघा संशयितांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. राजेंद्र सुर्यवंशी, मुथु पठाण, चेतन सुर्यवंशी यांच्यावर धारावी पोलीसांत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर कलम 506 (2), 143, 145, 504 आणि 135 अन्वये तक्रार नोंदवण्यात आलीय.

शिवसैनिकांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावीत देवीची मिरवणूक होती, त्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. सगळे कार्यकर्ते मिरवणुकीत जात असताना शिंदे गटाच्या माणसानं जातीवाचक शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यावर जाब विचारला असताना एकमेकांमध्ये बाचाबाची झाली, असं शिवसैनिकांचं म्हणणंय.

दरम्यान,  पोलिसांकडून आता व्हिडीओच्या माध्यमातून पडताळणी केली जातेय. त्यानंतर पुढील तपास करत दोषींवर कारवाई केली जाईल, असं सांगितलं जातंय. एकूणच दसरा मेळाव्याआधी दुसऱ्यांदा शिवसैनिक आणि शिंदे गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय. याआधी प्रभादेवीत गणपती विसर्जन मिरवणुकीनंतरही राजकीय राडा पाहायला मिळाला होता.

प्रभादेवीत झालेल्या राजकीय राड्यामध्ये शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला. तर यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आला होता. सध्या या प्रकरणाचाही दादर पोलिसांकडून तपास केला जातोय. हे प्रकरण ताजं असतानाच आता धारावीतही शिंदे विरुद्ध ठाकरे गटात शाब्दीक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालंय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.