Shivsena : 23 तारखेला शिवसेना केंद्रीय निवडणूक आयोगात हजर राहणार, काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष
शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षाच्या धनुष्यबाणावर आपला दावा सांगितला आहे.
मुंबई : 23 तारखेला शिवसेना (Shivsena) केंद्रीय निवडणूक आयोगात हजर राहणार आहे. शिवसेनेनं कागदोपत्री पुरावे निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. 23 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगात सुभाष देसाई, अनिल देसाई, अनिल परब आणि वकिल उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. कागदोपत्री पुरावे सादर केल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे 23 तारखेला काय होणार याकडे देशासह महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात (Central Election Commission) हजर राहून शिवसेना प्रत्यक्ष भूमिका मांडणार आहे.
कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते
निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला 8 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या कागदपत्रांच्या आधारे दोन्ही गटांकडून करण्यात येत असलेल्या निवडणूक चिन्हाच्या दाव्यावर आयोग निर्णय घेईल असं म्हटलं जात होतं. सुभाष देसाई, अनिल देसाई, अनिल परब आणि वकिल हे नेमकी निवडणुक आयोगाकडे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांचा पक्षाच्या चिन्हावर दावा
शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षाच्या धनुष्यबाणावर आपला दावा सांगितला आहे. यापूर्वी, शिंदे गटाला महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित सभापती राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे, त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खरी शिवसेना आहे अस पत्र देखील दिलं आहे.
आता निवडणूक आयोग निर्णय घेईल
या दोन्ही सभागृहात शिंदे गटाच्या नेत्याला नेता आणि मुख्य व्हीपचीही मान्यता मिळाली आहे. तर शिवसेनेतील उद्धव गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा सातत्याने करत आहे. आता दोन्ही पक्षांची कागदपत्रे पाहून खरी शिवसेना असण्याच्या अटी कोणता गट पूर्ण करतो याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. यानंतर ते याच गटाला ‘धनुष-बाण’ हे निवडणूक चिन्ह वाटप करणार आहेत.