रुईकर कुटुंबाला शिवसेनेची मदत, एकनाथ शिंदेंनी घेतली जबाबदारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी तिरुपती बालाजीला  पायी निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू झाला होता. सुमंत रुईकर  असे त्यांचे नाव आहे. ते मुळ बीड येथील रहिवासी आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. दरम्यान त्यांच्या मृत्यूनंतर शिवसेनेकडून त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यात आला आहे.

रुईकर कुटुंबाला शिवसेनेची मदत, एकनाथ शिंदेंनी घेतली जबाबदारी
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 3:48 PM

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी तिरुपती बालाजीला  पायी निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू झाला होता. सुमंत रुईकर  असे त्यांचे नाव आहे. ते मुळ बीड येथील रहिवासी आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. दरम्यान त्यांच्या मृत्यूनंतर शिवसेनेकडून त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यात आला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबीयांची जबाबदारी घेतली आहे. तसेच त्यांना पाच लाखांची मदत देखील देण्यात आली आहे. या मदतीने रुईकर कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे.

एकनाथ शिंदेंचा रुईकर कुटुंबीयांशी संवाद

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे रुईकर कुटुंबीयांशी संवाद साधला, त्यांनी सुमंत रुईकर यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. तसेच त्यांच्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी एखनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यांच्या कुटुंबाला प्राथमिक मदत म्हणून शिवसेनेच्या वतीने पाच लाख रुपये देण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी बाजीराव चव्हाण यांनी ही मदत रुईकर कुटुंबाकडे सुपुर्द केली. तसेच लवकरच घर देखील बांधून देणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

वाटेतच झाला मृत्यू

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुमंत रुईकर हे त्यांच्या मित्रासह तिरुपती बालाजीला पायी निघाले होते. मात्र रस्त्यातच त्यांना ताप आला. त्यांना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालावल्यानं सुमंत रुईकर यांचं शनिवारी दुपारी निधन झालं. ते त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. शिवसेनेकडून त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Mumbai Tree Walk: गर्द झाडीतून चालताना मुंबईत आहोत हेच विसरून जाल, मलबार हिल परिसरात सिंगापूरसारखा प्रकल्प

चर्चा तर होणारचः नाशिक महापालिकेची प्रभागरचना फुटली, इच्छुकांमध्ये भीतीचे काहूर; आयुक्तांना पत्र, कोर्टात जायचा इशारा

VIDEO: तेव्हा कुठे गेला होता तुझा राधासुता धर्म?, तर दोन हात करण्याची तयारी ठेवावी लागेल; भास्कर जाधव कडाडले

वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.