Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sena: एकनाथ शिंदेंसोबतच्या बंडखोर आमदारांवर शिवसेनेची कारवाई, प्रतोदांनी जारी केलेल्या पत्रातले 3 मोठे मुद्दे वाचा

शिवसेना आमदारांना मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी पाठवलेले पत्र नुकतेच पोहोचले आहेत. त्यापैकीच आमदार शंभुराजे देसाई यांना पाठवलेले पत्र माध्ममांच्या हाती लागलं आहे.

Shiv Sena: एकनाथ शिंदेंसोबतच्या बंडखोर आमदारांवर शिवसेनेची कारवाई, प्रतोदांनी जारी केलेल्या पत्रातले 3 मोठे मुद्दे वाचा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 3:02 PM

मुंबईः महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार बरखास्तीचं संकट गळ्याशी आलं असताना शिवसेनेनं आपल्या आमदारांना अखेरचं अल्टिमेटम दिलं आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी सर्व आमदारांना एक पत्र पाठवलं आहे. संध्याकाळी 5 वाजता वर्षा बंगल्यावर होणाऱ्या बैठकीसाठी हजर राहण्याचे आदेश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत. हा पक्षाचा आदेश असून तो न पाळल्यास कठोर कारवाई होईल, असा इशारा यातून दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असलेले, त्यांच्या प्रभावाखाली असलेले किंवा त्यांच्या नावाखाली नॉट रिचेबल असेलले अशा सर्व शिवसेना आमदारांना आता वर्षा बंगल्यावरील महत्त्वपूर्ण बैठकीसाठी हजर रहावं लागणार आहे. या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात, यावरच महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य अवलंबून आहे.

प्रतोपत्रातील मोठे तीन मुद्दे-

शिवसेना आमदारांना मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी पाठवलेले पत्र नुकतेच पोहोचले आहेत. त्यापैकीच आमदार शंभुराजे देसाई यांना पाठवलेले पत्र माध्ममांच्या हाती लागलं आहे. त्यातील प्रमुख तीन मुद्दे पुढील प्रमाणे-

  1. तातडीची बैठक पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न सध्या होत आहे. त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता, अशा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी 5 वाजता वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहणे सर्वच आमदारांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.
  2. उपस्थिती अनिवार्य या बैठकीला लिकित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर रहता येणार नाही. ही सूतना आमदारांना ईमेल तसेच व्हॉट्स अप तसेच समाजमाध्यमांद्वारेही पाठवण्यात आलेली आहे.
  3.  … तर स्वेच्छेने शिवसेना सोडा – दरम्यान सदर बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या आमदारांना तातडीनं पक्षातर्फे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला आहे. सदर बैठकाला आमदार उपस्थित नसतील तर स्वेच्छेने शिवसेना सोडण्याचा तुमचा इरादा आहे, असा अर्थ घेऊन संविधानातील सदस्य अपात्रते संदर्भात तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे प्रमुख प्रतोद सुनिल प्रभू यांनी दिला आहे.
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड.
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला....
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट....
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?.
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.