अमोल मिटकरींच्या भाषणांची अजितदादांना भुरळ; थेट विधान परिषदेवर संधी; कसा मिळाला टर्निंग पॉइंट? वाचा

आपल्या वक्तृत्वाने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे भल्या भल्यांना चितपट करत असतात. (shiv vyakhyate to political leader, know about amol mitkari)

अमोल मिटकरींच्या भाषणांची अजितदादांना भुरळ; थेट विधान परिषदेवर संधी; कसा मिळाला टर्निंग पॉइंट? वाचा
amol mitkari
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 6:08 PM

मुंबई: आपल्या वक्तृत्वाने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे भल्या भल्यांना चितपट करत असतात. प्रचंड अभ्यास, प्रत्येक मुद्द्याचं खंडन करताना दिलेले संदर्भ आणि आवाजातील गोडवा या बळावर मिटकरी सहज मैदान मारून जातात. हजारोंच्या सभांवर आपली भुरळ पाडत असतात. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही मिटकरी यांचं भाषण ऐकलं आणि ते मिटकरींच्या प्रेमातच पडले. त्यांच्या भाषणावर खूश होऊन अजितदादांनी मिटकरींना थेट विधानपरिषदेत पाठवलं. काय आहे हा किस्सा? मिटकरींचा राजकीय प्रवास कसा आहे? याचा घेतलेला हा आढावा. (shiv vyakhyate to political leader, know about amol mitkari)

कुठून कुठे?

अमोल मिटकरी हे अकोला जिल्ह्यातील. अकोल्याच्या अमरावती सीमेवर असलेल्या कुटासा हे त्यांचे गाव. त्यांच्याकडे दोन एकर शेती होती आणि किराणा दुकान होते. मात्र, त्यांच्या वडिलांना समाजसेवेची आवड होती. त्यांच्या कुटुंबावर गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रचंड प्रभाव होता. समाजसेवेचा हा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. मिटकरींना लहानपणापासून भज किर्तन यात रस होता. गावागावात ते भजन-किर्तनातून संतांचे विचार पोहोचवत असत. त्यातूनच वक्ता म्हणून त्यांची जडणघडण झाली. जसजस कळू लागलं तसतसं त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, सर्व संत, संविधान यांचा अभ्यास सुरू केला आणि या महापुरुषांचे विचार ते व्याख्यानातून मांडू लागले. शिवव्याख्याते म्हणून त्यांचा लौकिकही वाढला.

पहिलं भाषण गाजलं

2012 मध्ये सिंदखेडराजा येथे त्यांना ऐनवेळी भाषण करण्यास सांगण्यात आलं. त्यावेळी त्याचं भाषण गाजलं. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जन्मगाव असलेल्या नाशिकच्या भगूरमध्ये त्यांनी परखड भाषण करत प्रतिगाम्यांवर प्रहार केले होते. त्यामुळे श्रोत्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं.

वक्ते घडवण्याची फॅक्ट्री

मिटकरी यांनी सुरुवातीच्या काळात अकोल्यात राहून आपल्या वक्तृत्व कलेचा अनेकांना लाभ दिला. त्यांनी 2017मध्ये जाणीव असलेला वक्ता घडवण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या माध्यमातून अनेक वक्तेही घडले.

पवारांशी पहिली भेट, पण…

16 मे 2019मध्ये अमोल मिटकरी हे पहिल्यांदा अजित पवारांना भेटले. धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर त्यांची अजितदादांशी भेट झाली. अनेक खटपटी केल्यानंतर त्यांची अजितदादांशी भेट झाली होती. अनेकदा पीएला फोन, मेसेज. अखेर अजित दादांनी भेटीला बोलावलं. मुंबईत भेटायचं तर कोणी ओळखीचं नाही. मग मिटकरी यांनी सीएसएमटी स्टेशन गाठल्यावर शेजारी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतालयात आंघोळ उरकून घेतली. तिथून बी ५ बंगल्यावर धनंजय मुंडे यांचा बंगला असल्याचं माहिती झाल्यावर तिथं गेले. अजितदादांची भेट घेतली. सर्वसाधारण व्हिजीटरसारखे अजित पवार त्यांना भेटले. पक्षासाठी काम करायची इच्छा व्यक्त केली. अजितदादांनी ऐकून जायला सांगतिलं..नंतर चर्चेअंती राज्य पातळीवर एक पद दिलं गेलं..पण पक्षातल्या पदाबरोबर आपल्या वकृत्वाचा वापर पक्ष कधी करणार असा प्रश्न मिटकरी यांना पडला होता.

राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

मिटकरी यांना आपली वक्तृत्वशैली अजितदादांना दाखवायची होती. पण संधी मिळत नव्हती. अखेर ती संधीही आली. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तीने ही संधी मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं शिवस्वराज्य यात्रा काढली. शिवनेरीवरुन सुरु झालेल्या यात्रेवेळी अमोल मिटकरीचं नाव कुणालाही माहित नव्हतं..पण या यात्रेची सांगता झाली तेव्हा मिटकरी यांच्या भाषणांची मागणी राष्ट्रवादीचेच उमेदवार करत होते. वाशिममध्ये यात्रा आली असताना अवघ्या 10 मिनिटे भाषण करायची संधी मिळाली आणि त्याचं सोनं करत मिटकरी यांनी मोठा पल्ला गाठला. आतापर्यंत व्याख्यान देऊन कुटुंब चालवणारे मिटकरी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक झाले.

हेलिकॉप्टर दिमतीला आले

अवघ्या काही महिन्यांपूर्वी मुंबईत आल्यावर सीएसएमटी जवळच्या सार्वजनिक स्वच्छतालयात आंघोळ उरकून मिटकरी अजितदादांना भेटायला गेले होते. परंतु अवघ्या काही महिन्यातच राष्ट्रवादीने त्यांना प्रचारासाठी हेलिकॉप्टर दिलं. वकृत्वाच्या जीवावर पहिल्यांदाच हवाई प्रवासाचं स्वप्नही मिटकरींनी प्रत्यक्षात उतरवलं. थोड्या नाही तर तब्बल 65 सभा विधानसभा निवणुकीच्या निमित्तानं त्यांनी घेतल्या. या निमित्ताने राष्ट्रवादीचे सभा गाजवणारे नेते म्हणून त्यांची ख्याती पसरली.

‘शारदा’ पावली

बारामतीमध्ये अजितदादांनी शारदा व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. या व्याख्यानमालेत भाषण करण्याची संधी दिली. त्यांचं हे भाषण ऐकून पवार प्रभावित झाले. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या प्रत्येक सभा गाजवू लागले. त्यांच्या या वक्तृत्वाच्या जोरावरच अजितदादांनी त्यांना थेट विधान परिषदेची संधी दिली.

पुरंदरेंना विरोध

मिटकरी यांनी त्यानंतर भांडारकर प्रकरण असो की वाघ्या कुत्र्याचे प्रकरण, भीमा कोरेगावची हिंसा असो की इतर कोणतेही प्रकरणे… प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका घेत परखड विचार मांडले. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. त्यालाही मिटकरी यांनी विरोध केला होता. (shiv vyakhyate to political leader, know about amol mitkari)

संबंधित बातम्या:

चौथ्यांदा आमदार, हत्येचाही आरोप; वाचा, कोण आहेत किसन कथोरे?

दहशत आणि विकास… हितेंद्र ठाकूर राजकारणात कसे आले? वाचा सविस्तर

108 वर्षांपूर्वी पूर्वज आले अन् मुंबईकर झाले, तीनदा बेस्ट आमदार; कोण आहेत योगेश सागर?

(shiv vyakhyate to political leader, know about amol mitkari)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.