Lok Sabha Election 2024 | शिंदेंची साथ सोडून पुण्यातील एक मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का?

Lok Sabha Election 2024 | महाराष्ट्रातल सध्याच राजकीय समीकरणच पूर्णपणे वेगळ आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत सहभागी आहेत. आगामी लोकसभा निवडणूक या तिन्ही पक्षांना एकत्र लढवायची आहे.

Lok Sabha Election 2024 | शिंदेंची साथ सोडून पुण्यातील एक मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का?
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 11:15 AM

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून पुण्यातील एक मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. आज या नेत्याच्या त्याच्या समर्थकांची बैठक बोलवली आहे. त्यात काय निर्णय होतो? यावर बरच काही पुढच अवलंबून आहे. काहीही करुन आगामी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निश्चय या नेत्याने केला आहे. त्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. महाराष्ट्रातल सध्याच राजकीय समीकरणच पूर्णपणे वेगळ आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत सहभागी आहेत. आगामी लोकसभा निवडणूक या तिन्ही पक्षांना एकत्र लढवायची आहे. त्यामुळे जागा वाटपाचा मोठा तिढा आहे. कारण कुठलाही पक्ष त्या जागेवरुन आपला दावा मागे घेणार नाही. अशा स्थितीत या नेत्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाशिवाय पर्याय नाहीय.

पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्ष दावा सांगतायत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट दोघेही ही जागा आपल्या पदरात पडावी यासाठी प्रयत्न करत आहेत. आधी शिवेसना एकसंध होती. भाजपा-शिवसेना युती असताना शिवाजीराव अढळराव पाटील यांनी शिरुरच लोकसभेमध्ये प्रतिनिधीत्व केलं. पण मागच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांनी शिरुरमध्ये अढळराव पाटलांचा पराभव केला.

राष्ट्रवादी काँग्रेस मागे हटायला तयार नाहीय

सध्याच्या राजकीय स्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष फुटले. दोन्ही पक्षातला एक गट सत्ताधारी आणि एक गट विरोधी पक्षात आहे. विरोधी पक्षात असलेल्या शरद पवार गटातून अमोल कोल्हेच शिरुरमधून उमेदवार असण्याची शक्यता आहे. पण सत्तेत असलेला अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट दोघेही शिरुरवर आपला दावा सांगतायत. त्यात राष्ट्रवादीने मागच्यावेळी ही जागा जिंकलेली. त्यामुळे ते मागे हटायला तयार नाहीयत. शिवाजीराव अढळराव पाटील यांचा दांडगा जनसंपर्क आहे, ते स्ट्राँग उमेदवार आहेत. फक्त पक्ष कुठला? हा प्रश्न आहे. आज शिवाजीराव अढळराव पाटील आपल्या समर्थकांची बैठक घेणार आहेत. त्यात ठरलं, तर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन त्या तिकीटावर निवडणूक लढवतील.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.